साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात 'एक विद्यार्थी-एक वृक्ष' उपक्रम
वसुंधरा प्रतिष्ठानचा पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : वृक्षांची चळवळ ही लोकचळवळ व्हावी या हेतूने वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षांपासून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत वृक्ष लागवड आणि संवर्धन ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील अवंती नगरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात 'एक विद्यार्थी-एक वृक्ष' हा उपक्रम शनिवारी राबविण्यात आला. या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या घरी झाडे लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांना वृक्ष रोप वाटप करण्यात आले. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून वृक्षांची चळवळ विद्यार्थी चळवळ होण्यास मदत होणार आहे.
या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने तर मंचावर वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, मुख्याध्यापक इस्माईल शेख, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. अजित चिखलीकर, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी, वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर, शहराध्यक्ष उमेश ब्याकोडे, कोअर कमिटी सदस्य शिवाजी निरमनाळे, सदस्य संतोष धनुरे, वैभव वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा.योगेश शर्मा म्हणाले, वृक्षांची चळवळ ही सर्वांनी मिळून पुढे नेण्याची गरज आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे कार्य केले जात आहे.
यावेळी बोलताना कालिदास माने म्हणाले, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. विद्यार्थ्यांनी वृक्ष चळवळ हाती घेतल्यास याला गती प्राप्त होणार आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने सुरू केलेला 'एक विद्यार्थी-एक वृक्ष' हा अभिनव उपक्रम असून, यात प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून जे विद्यार्थी वृक्ष संवर्धन करतील त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. सूत्रसंचालन गणेश परळे यांनी तर शेवटी आभार मुख्याध्यापक शेख यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक डिगोळे गंगाधर, कावळे स्मिता, परळे गणेश, कोयले हरिदास, काळगापुरे कमल, यादव मिनाक्षी, पवार शशिकांत दत्तात्रय, डोनगावे कोमल, गायकवाड सतिश, पवार अमोल, धोत्रे वैभव, पाटील सुनंदा, वडवळे नवनाथ,लहाडे दयानंद, बनसोडे पौर्णिमा, सूर्यवंशी भरत, माने गजानन, सचिन माने, सत्यपाल जाधव, गायकवाड राहुल आदी शिक्षक तथा शिक्षकेत्तर मध्ये लिपीक सचिन जाधव, सेवक सुतार सूर्यकांत, छायाचित्रकार गणपत गरड आदींनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق