श्री गणेश विद्यालय ,सेलू येथे क्रांतिकार दत्तोबा भोसले यांच्या विषयी व्याख्यान संपन्न

श्री गणेश विद्यालय ,सेलू येथे क्रांतिकार दत्तोबा भोसले यांच्या विषयी व्याख्यान संपन्न 
औसा/प्रतिनिधी-'श्री गणेश विद्यालय सेलू ' येथे भारतीय स्वातंत्र्याचाअमृत महोत्सवी वर्ष परिपुर्ती निमित्ताने "हैद्राबाद मुक्ति संग्रामात क्रांतिवीर " दत्तोबा भोसले यांच्या योगदाना विषयी व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल मंगळगिरे सर होते,प्रमुख पाहुणे व प्रमुख व्याख्याते " श्री संगमेशवर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ ,औसा या संस्थेचे सचिव "श्री प्रा दत्तात्रय सुरवसे होते, प्रमुख उपस्थितीत शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री गाडेकर सर व सुनील सुर्यवंशी सर हे उपस्तिथ होते. या कार्यक्रमात श्री सुर्यवंशी सर यांनी प्रास्ताविका मध्ये आ. प्रा. सुरवसे यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री .प्रा .सुरवसे सरांनी "दत्तोबा भोसले क्रांतिकार" यांच्या कार्याची सखोल माहिती दिली , मातोळा येथे 19 नोव्हेंबर 1918 रोजी जन्म,प्राथमिक शिक्षण मातोळा येथे उर्दू माध्यमातून,*राष्ट्रीय शाळा* हिप्परगा येथे शालेय शिक्षण व शारीरिक शिक्षण,कुस्तीपट्टू, मल्लखांब घोडेस्वार हे शिक्षण घेतले.सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूल येथे 1935 मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर बडोदा येथील *अखिल भारतीय हिंद विजय जिमखाना* येथे कुस्ती चे पुढील धडे घेतले होते व गामा पहिलवान यांचा त्यांनी पराभव केला होता,बडोदा येथे सांगली चे राजाराम बापू पाटलांनी दत्तोबा व क्रांतिसिंह नाना पाटलांची भेट घडवून आणली होती. दत्तोबा भोसले यांनी बार्शी तालुक्यातील चिंचोली,जवळे दुमला,उपळे, गुडगाव, धानोरा, तडवळे, काजळा इत्यादी अनेक ठिकाणी कॅम्पस उभारले होते त्यांनी 65 गावे निमाजाच्या तावडीतून मुक्त केले होते आणि *मुक्तापूर स्वराज्याची* स्थापना केली होती , देवताळा येथे 1948 मध्ये त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दीडशे रझाकांराचा खात्मा केला होता अशी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली,.विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीचा मोलाचा संदेश दिला.व तसेच क्रांतिवीर दत्तोबा भोसले विचार यात्रा 17 सप्टेबंर पर्यत चालूच राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आध्यक्षीय भाषणामध्ये शाळेचे मु.अ .श्री मंगळगिरे सरांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल शिंगापुरे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास सर्वचं शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्तिथ होते.

Post a Comment

أحدث أقدم