९ ऑगस्ट रोजी किल्लारी गाव बंद व रस्ता रोको आंदोलन होणार-तालुका निमिर्ती कृती समिती


९ ऑगस्ट रोजी किल्लारी गाव बंद व रस्ता रोको आंदोलन होणार-तालुका निमिर्ती कृती समिती 

किल्लारी- किल्लारी तालुका निर्मिती करण्यात  यावी ही गेल्या ४० वर्षापासून मागणी आहे. १९९३ च्या भूकंप पुर्नवसनात तालुका निर्मितीच्या अनुषंगाने शहर पुर्नवसन झाले. विविध तालुकास्तरीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज खुली जागा आरक्षित असुन वारंवार निवेदने देऊनही शासन दरबारी दखल घेतली जात नाही. त्यामुळे बुधवारी दि 2 ऑगस्ट रोजी किल्लारी तालुका निर्मिती कृती समितीने बैठक घेऊन विविध ठराव घेतले. 
      मागील अनेक वर्षापासून किल्लारी विकासापासून दूर असून येथील अनुशेष भरून काढावा यासाठी लोकांनी नवीन उमेदवारांना संधी दिली असली तरी किल्लारीचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन व प्रशासन हे उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या किल्लारी तालुका निर्मिती कृती समितीने बैठक घेऊन किल्लारी तालुका निर्मिती बाबत आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी भूमिका घेतली.
    आंदोलनासाठी किल्लारी व परिसरातील सर्व पक्षीय सरपंच, चेअरमन आदींना आवाहन करणे, तालुका नकाशासह प्रसिद्धी करणे, शासन स्तरावर प्रश्न लावून धरणे, आंदोलन कोणाच्या विरोधात किंवा समर्थनात नसुन विधानसभेच्या अधिवेशनात विषय मांडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देणे, १५ आगस्टच्या ग्रासभेत परिसरातील सर्व ग्रामपंचायतने पुन्हा एकदा ठराव घेणे. आमदार शिफारस करणार नाहीत तो पर्यंत किल्लारी तालुका होणार नाही. त्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी तालुका निर्मितीचे नेतृत्व करत शासन दरबारी शिफारस करावे. 
              यापुर्वीही जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. किल्लारीत आल्यावर प्रत्येक वेळी आमदारांना मागणी केली आहे. आत्तापर्यंत किल्लारी ने आक्रमक भूमिका घेतली नव्हती. मात्र गाव व परिसरातील गावे आक्रमक होऊन खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळेच क्रांती दिनी गाव बंद व साखळी उपोषण करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी तालुका निर्मितीचे नेतृत्व करावे व आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असा ठराव घेतला गेला.
      बुधवारी ( दि 9 ऑगस्ट रोजी ) क्रांती दिनी संपूर्ण गाव, बाजारपेठ बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करणे, आंदोलन स्थळी येऊन आमदारांनी किल्लारीकरांना शब्द दिल्यास आंदोलन थांबवण्यात येईल अन्यत: गुरुवार  (दि. १० ऑगस्ट) पासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. 
     यावेळी अमर बिराजदार, महादेव पाटील, सतीश भोसले, प्रकाश पाटील, किशोर जाधव, शरद भोसले, हारून अत्तार आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवृत्ती भोसले गुरुजी, महादेव पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, प्रकाश मिरगे, सोसायटीचे चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच युवराज गायकवाड, माजी उपसरपंच हरून अत्तार, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, डॉ. राजेश गुंजोटे, डॉ. श्रीनिवास नोगजा, हरीश डावरे, सतीश भोसले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, सचिन माने, वाघम्बर कांबळे, विनोद बाबळसुरे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अशोक गावकरे, रमेश हेळंबे, दिलीप लोहार, किशोर जाधव, गोविंद भोसले, विजयकुमार भोसले, अशोक पाटील, दीपक पाटील, चंदू पाटील, किशोर भोसले, अमोल गावकरे, येळवटचे उपसरपंच बाबुराव बिराजदारसह मंगरूळ, नदी हत्तरगा, तळणी, कवठा, कारला, कुमठा, येळवट, सिरसल येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, कृती समिती सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم