लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियान रॅली

लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियान रॅली

 औसा/प्रतिनिधी -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर ,कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ,कॉलेज ऑफ सायन्स लातूर आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने अवयवदान जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली.
 उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे व पोलीस कर्मचारी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून झाले .यावेळी प्रमुख उपस्थित कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे, माधुरी बावगे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला,बिराजदार डी एस यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणी विद्यार्थी उपस्थित होते
ही फेरी लातूर शहरातील हनुमान चौक तापडिया मार्केट गांधी मार्केट पोस्ट ऑफिस महात्मा गांधी चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क बसवेश्वरचौक या मार्गे करण्यात आले प्रत्येक चौकात जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी "अवयवदान हे श्रेष्ठदान आहे , अवयवदान हे पुनर्जीवन आहे "या घोषणा देऊन अवयवदाना बद्दल महत्व सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم