डॉ. नरेद्र दाभोलकर यांचा १० वा स्मृती दिन माधवराव पाटील महाविद्यालयात साजरा
मुरूम/प्रतिनिधी -शहीद डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील महाविद्यालयात रविवारी (ता.२०) रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. दिनकर बिराजदार, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. विलास खडके, डॉ. नरसिंग कदम, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुदिप ढंगे, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. राजेंद्र गणापूरे, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. दिपाली स्वामी, प्रा. लक्ष्मण पवार, मल्लू स्वामी, आनंद वाघमोडे, अमोल कटके, किशोर कारभारी, दिलीप घाटे, चंदकांत पुजारी आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुजित मटकरी यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिस अभिवादन करताना अशोक सपाटे, दिनकर बिराजदार, महेश मोटे, रविंद्र गायकवाड, सुधीर पंचगल्ले आदी.
إرسال تعليق