लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा स्मृती दिन व लातूर मिशनचा दशकपुर्ती महोत्सव निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट रोजी शिवरत्न पुरस्कार वितरण

 लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा स्मृती दिन व लातूर मिशनचा दशकपुर्ती महोत्सव निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट रोजी शिवरत्न पुरस्कार वितरण

लातूर  : लातूर मिशन वृत्तपत्राचा दहावा वर्धापन दिन व शिवदर्शन फांऊडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रशासनासह वेगवेगळया क्षेत्रातील यशस्वी व उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मानाचा शिवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येत असते. दर वर्षी लातूर मिशन वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यावर उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. आत्तापर्यंत ७९ कर्तृत्ववान व्यक्तींना शिवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वृत्तपत्राने वेळोवेळी रोखठोक व निर्भीड भूमिका घेऊन राजकीय, प्रशासकीय व सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम गेल्या १० वर्षापासून अविरतपणे केले आहे. तसेच सामाजिक कार्यात सुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातून एक वेगळी छाप वाचकांच्या व सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवली आहे. या वर्षी दशकपुर्ती महोत्सव असल्याने शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. किशन महाराज परचंडेकर, उद्घाटक म्हणून माजी खा. डॉ. सुनिल बळीराम गायकवाड, आ.विक्रम काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदिश बावणे, प्रमुख उपस्थिती जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, जेष्ठ पत्रकार अशोक चिंचोले या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावर्षीचा २०२३ शिवरत्न पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत. सौ. पद्मीन सोदले सरपंच ग्रामपंचायत कव्हा, ह.भ.प. रंजन गुरूजी चव्हाण खानापूूरकर सांप्रदायीक, कुलदिप देशमुख नायब तहसिलदार पुरवठा विभाग लातूर, भगवान दुधाटे सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर, सुनिल देशमुख स्थापत्य अभियंता विलास सह.साखर कारखाना तोंडार, नरसिंह घोणे संपादक दै. मराठवाडा केसरी, निलेश बिराजदार वन परिमंडळ अधिकारी लातूर, महादेव उबाळे चेअरमन रखुमाई निधी लि. लातूर, शेख एस.आर. ग्रामसेवक आर्वी, ग्रीन लातूर वृक्ष टीम सामाजिक कार्य या मान्यवरांना या वर्षीचा शिवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच विहान निलेश पौळ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस या चिमुकल्याचा विशेष सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमात लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदर्शन फांऊडेशन यांच्या वतीने अनाथ, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या शिवरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या पाठिवर कौतुकाची थाप देण्यासाठी या पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळयाला आपण दि. ३१ ऑगस्ट २०२३ वार गुरूवार रोजी  सकाळी १०.३० वा. स्थळ ः डॉ. भालचंद्र ब्लड बँक, बसस्टँड पाठीमागे, लातूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन भारत जाधव मुख्य संपादक लातूर मिशन वृत्तपत्र तथा अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन लातूर, उपसंपादक परमेश्‍वर घुटे, कार्यकारी संपादक सुरेश काचबावार, सल्लागार - प्रा. तानाजी घुटे, कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, गोविंद जगताप, ऍड. नामदेव शिंदे, दयानंद माने, शंकर जाधव, अमित तिकटे, कैलास ढोले, श्रीमंत होळे, विष्णु शिंदे, महेश राठोड, सादिक शेख, गणेश स्वामी, प्रा.विनोद चव्हाण, मनोज चव्हाण, प्रा.बालाजी वाघमारे, कुमार भालेराव, उमेश भिसे, केदार वांगसकर, महालिंग तटाळे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, दिपक बोराडे पाटील, तुकाराम जोगदंड, सोपान जाधव, अजित दुटाळ, बालाजी कांबळे, प्रदिप शिंदे, उमाकांत माळी, अनिल शेळके, दिपक शिंदे, शुभम चव्हाण, ओमकार सरडे, गणेेश पाटील, संतोष मगर, मंगेश आडे, दयानंद स्वामी,  सुरज मगर, गणेश भोसले, ईश्‍वर पानढवळे, लाला बोराडे, अर्जुन लोखंडे, परमेश्‍वर माचवे, अमर जाधव, प्रकाश चिंताले, लखन सावंत,  ऋषिकेश मोरे,  संपत भिसे आदींनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم