तहसील कार्यालय औसा येथे "जनसंवाद" कार्यक्रम संपन्न

तहसील कार्यालय औसा येथे "जनसंवाद" कार्यक्रम संपन्न 
औसा/प्रतिनिधी-महसुल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दिनांक २५/०७/२०२३ मधील मार्गदर्शक सुचना व मा. जिल्हाधिकारी लातूर यांचे संकल्पनेतुन महसूल सप्ताह या कार्यक्रमांतर्गत दिनांक ०४/०८/२०२३ " जनसंवाद" हा कार्यक्रम घेण्यांत आला. तहसील कार्यालय औसा येथे "जनसंवाद" कार्यक्रमामध्ये लातूर जिल्हयांत प्रथमतः सलोखा योजनेचा प्रारंभ औसा तालूक्यांतुन झाला असुन, मौजे हिप्परगा (क) ता. औसा येथील ०२ लाभार्थी यांना श्री. मुकुंद चंद्रकांत माने व श्रीम. सुनिता दयानंद सपकाळ यांना सलोखा योजनेमार्फत जिल्ह्यातील पहिला लाभ देण्यांत आला आहे.

सलोखा योजनेमध्ये शेतक-यांच्या जमिनीचे वाद संपुष्ठात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सोख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनांने अशा एका शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या नावांवरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक- याकडे असणा-या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी सलोखा योजनेअंतर्गत नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येते. शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु. 1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्यांबाबत सवलत देण्यांची सलोखा योजना राबविण्यांस शासन मान्यता देण्यांत आली आहे. यामध्ये शेतक-यांना अदलाबदली दस्त करणेसाठी दोन्ही जमिनींच्या व्यवहारापोटी संबंधित शेतक-यांना जमिनीच्या मुल्यांकनाच्या ४ टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्के नोंदणी फिस असे एकूण ५ टक्के रक्कम शासन जमा करावी लागली असती, परंतु महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेमुळे जनतेस न्याय व दिलासा मिळुन त्यांच्यातील वैर संपुष्टात येवुन समाजात सलोखा निर्माण होणार आहे. या योजनेमुळे दिवाणी तसेच महसुली दावे दाखल होण्याचे प्रमाण कमी होवुन प्रशासकीय वेळ वाचणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मा. श्री. सुनिल यादव अपर जिल्हाधिकारी लातूर यांनी केले.

तसेच औसा तालुक्यातील सर्व महसूल मंडळ विभागाच्या मुख्यालय स्तरावर शेतक-यांच्या जमिन विषयक नोंदी तसेच फेरफार अदालतींचे आयोजन करण्यांत येवून सर्व नागरीकांच्या महसुल विभागाशी संबंधित विविध समस्या सोडविण्यांत आल्या व सलोखा योजनेविषयी जनजागृती करण्यांत आली तसेच संबंधित लाभार्थ्यांना दाखले वितरीत करण्यांत आले, औसा / उजणी मंडळ विभागाचे श्री. डी. एन. भुजबळ मंडळ अधिकारी यांनी १७ फेरफार मंजूर करुन त्याचे फेरफार, ७/१२ व ८ अ तसेच ११ रेशन कार्ड व २७ संगायो लाभार्थीचे मंजुरी पत्र, मा. श्री. सुनिल यादव अपर जिल्हाधिकारी लातूर यांचे हस्ते वाटप ही करण्यात आले. तसेच भुमी अभिलेख कार्यालयामार्फत महास्वामित्व योजनेअंतर्गत मौजे रिंगणी व गुळखेडा येथील गावठाण मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणी करुन मिळकतींची सनद व मोजणी नकाशे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सदरील जनसंवाद कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी सुनिल यादव, उपविभागीय अधिकारी औसा-रेणापूर अविनाश कोरडे, तहसीलदार औसा भरत सुर्यवंशी,अपर तहसीलदार निलेश होनमोरे, उपअधिक्षक भुमी अभिलेख हेमंत निगडे, दुय्यम निबंधक विशाल जगदाळे, निवासी नायब तहसीलदार दत्ता कांबळे,
नायब तहसीलदार महसुल सुरेश पाटील, मंडळ अधिकारी औसा/उजनी डी. एन.भुजबळ,तलाठी विकास बिराजदार  व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचेसह तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم