मुरूम नगर परिषद कडून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वृक्षारोपण

मुरूम नगर परिषद कडून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वृक्षारोपण

मुरूम,(प्रतिनिधी) : नगर परिषदकडून माझी वसुंधरा या अभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गुरुवारी (ता. ३) रोजी विविध प्रकारच्या वृक्षाची मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते लागवड करून यावर्षीचा वृक्ष लागवडीचा श्री गणेशा करण्यात आला. मुरूम नगर परिषदमार्फत हरघर नर्सरी व कार्यालय नर्सरी तसेच माझी वसुंधरा या अभियानांतर्गत विविध जातीचे पंधरा हजार वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. यापैकी आठ हजार रोपे नगरपरिषदेच्या नर्सरीमध्ये तयार करण्यात येत असून बाकी उर्वरित रोपे वन विभागाकडून मागविण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात आज मुरूम येथील नगर परिषदच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात एका दिवसात ६०० वृक्षाची लागवड करून करण्यात आली. यात विशेष बाब म्हणजे लागवड करण्यात आलेली सर्व रोपे नगर परिषदच्या नर्सरीमध्ये बियांपासून तयार करण्यात आलेली आहेत. या रोपामध्ये करंज, आपटा, चिंच, रामफळ, जांभूळ आदी प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांमध्ये जलशुद्धीकरण परिसरामध्ये नगरपालिकेकडून पेरू, आवळा, सागवान व बांबू या वृक्षाच्या बागा तयार करण्यात आलेल्या आहेत. याच परिसरात घनवन देखील निर्माण करण्यात आलेले आहे. यामुळे शहराचा सौंदर्य वाढले आहे. नगरपरिषेच्या शहरातील खुल्या जागेत येणाऱ्या काळात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी सांगितले. तसेच हरघर नर्सरी या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये नागरिकांनी बियापासून ५० रोपांची निर्मिती करून घरात जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी लागवड करावी. जागा नसल्यास ती रोपे नगर परिषदेस द्यावी. या रोपांची लागवड व जोपासना नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल, असे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन केले.

Post a Comment

أحدث أقدم