साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 
निलंगा/प्रतिनिधी- डॉ. अरविंद भातांब्रे  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विलासराव देशमुख यांच्या 11 व्या पुण्यतिथी निमित्त व स्वतंत्र दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी मोफत देण्यात आली.
     या शिबिराची सुरुवातीला विलासराव देशमुख  यांच्या प्रतिमेच पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित निलंगा काँग्रेस चे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष-हमीद भाई शेख, मा.सभापती अजितजी माने , जिल्हाध्यक्ष काँग्रेस प्रशिक्षण सेल चक्रधरजी शेळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य पंकज दादा शेळके, माजी प.स.सदस्य महेशजी देशमुख व दयानंदजी चोपणे व आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये 109 लोकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये या तज्ञ डॉक्टराणी प्रथम उपचार केला त्यात डॉ.अरविंद भातांब्रे साहेब डॉ.राजशेखर मेनगुले डॉ. संदीप जाधव आदी.
   यावेळी डॉक्टर अरविंद भातांब्रे साहेब म्हणाले की निलंगा तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या समस्या पासून मुक्त करणे हे प्रथम माझे कर्तव्य आहे अनेकांना पैसे नसल्याने आरोग्य सुधारता येत नाही यामुळे तालुक्यातील जनतेला नेहमीच जास्तीत जास्त शिबिर घेऊन जनतेचे आरोग्य सुधारण्याच काम मी करत आहे.

Post a Comment

أحدث أقدم