*श्रावण सखीत दंग*

*श्रावण सखीत दंग*

बरसे श्रावणसरी,नाचे मोर धरेवरी!
ऊनपावसाचा खेळ, वारा वाजवी बासरी !!

हिरव्या पाचुंची शोभे,
मखमली सजावट!
उगाच लांबते वेडी
वळणाची पायवाट !!
गंधाळतो पारीजात,मन अधीर सासरी!
ऊन पावसाचा खेळ,वारा वाजवी बासरी !!

स्वप्नी फुटता धुमारे
मेहंदीस चढे रंग !
झुला झुलतो फांदीला
श्रावण सखीत दंग !!
पानाफुलांची नक्षी,गुंफीते वेली साजीरी!
ऊन पावसाचा खेळ,वारा वाजवी बासरी !!

गंध श्वासात केसात
गाणी पक्ष्यांची मनात!
हिरव्या रंगात रंगते
नवचैतन्य रानात!!
इंद्रधनूची कमान,तोरण बांधिले वरी !
ऊन पावसाचा खेळ ,वारा वाजवी बासरी!!

लहरते वसुंधरा
कणकण अंकुरते !
पीऊन अमृतधारा
शहारते झंकारते !!
माळुनी मनी मोगरा,लाजते पोरं हासरी!
ऊन पावसाचा खेळ,वारा वाजवी बासरी!!

*भारत कांबळे,औसा.*
*मो:- 7709383468*

Post a Comment

أحدث أقدم