माधवराव पाटील महाविद्यालयात चंद्रयान-३ मोहिमचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

माधवराव पाटील महाविद्यालयात चंद्रयान-३ मोहिमचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
मुरुम (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागामार्फत संशोधन केंद्रात प्रोजेक्टरद्वारे बुधवारी (ता. २३) रोजी चंद्रयान-३ मोहिमचे थेट प्रक्षेपण विद्यार्थीना दाखविण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशान्वे चंद्रयान-३ मोहिमचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयात दाखविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रेक्षपण दाखविण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सतिश शेळके, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. संजय गुरव आदींनी हे प्रक्षेपण दाखविण्यासाठी पुढाकार घेतला. चंद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण टोकावर यशस्वी लँडिंग केल्याने जगात भारत हा पहिला देश ठरल्याने यावेळी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व त्यांच्या टीमचे विभागामार्फत कौतुक व अभिनंदन करण्यात आले. आपण भारताच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार झाल्याचा आनंद व्यक्त करून पुढील कार्यासाठी भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी डॉ. महेश मोटे, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. किरण राजपूत, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. रविंद्र गायकवाड, डाॅ. सुजित मठकरी, डॉ. सुशील मठपती, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. राजकुमार देवशेट्टे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم