समाजातील कर्तृत्वान व्यक्तींना पारखून शिवरत्न पुरस्काराने सन्मान करणे अभिमानास्पद ह.भ.प. किशन महाराज परचंडेकर

 समाजातील कर्तृत्वान व्यक्तींना पारखून शिवरत्न पुरस्काराने सन्मान करणे अभिमानास्पद  ह.भ.प. किशन महाराज परचंडेकर



लातूर -सध्या सर्व समुह एकत्रीत येऊन विधायक कार्य हाती घेत व धर्म जागृत करणारे कार्य करते त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पारखून योग्य सन्माण दिला जातो  हे महत्वाचे कार्य लातूर मिशन वृत्तपत्राने हाती घेतले आहे. सर्व स्तरातील लोक एकत्र आल्याने एक वेगळी दिशा मिळते. त्या दिशेने असत्याचा नाश होते. कोणतेही कार्य असो त्या कार्याला धर्माची जोड असते. आज शिवरत्न पुरस्कार सोहळ्यास सर्व कर्तृत्वान व्यक्तींना पारखून पुरस्कार प्रदान केला हे अभिमानास्पद आल्याचे अध्यक्षीय भाषणात श्री ह.भ.प. किशन महाराज परचंडेकर म्हणाले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी खा. डॉ. सुनिल बळीराम गायकवाड, शिक्षक आ.विक्रम काळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदिश बावणे, प्रमुख उपस्थितीत जि.प.च्या माजी अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, दै. भुकंपचे संपादक अशोक चिंचोले, लातूर मिशनचे संपादक भारत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ. पद्मीन सोदले सरपंच ग्रामपंचायत कव्हा, ह.भ.प. रंजन गुरूजी चव्हाण खानापूूरकर सांप्रदायीक, कुलदिप देशमुख नायब तहसिलदार पुरवठा विभाग लातूर, भगवान दुधाटे सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर, सुनिल देशमुख स्थापत्य अभियंता विलास सह.साखर कारखाना तोंडार, नरसिंह घोणे संपादक दै. मराठवाडा केसरी, निलेश बिराजदार वन परिमंडळ अधिकारी लातूर, महादेव उबाळे चेअरमन रखुमाई निधी लि. लातूर, शेख एस.आर. ग्रामसेवक आर्वी, ग्रीन लातूर वृक्ष टीम सामाजिक कार्य या मान्यवरांना या वर्षीचा शिवरत्न पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला तसेच विहान निलेश पौळ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस या चिमुकल्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व  सहपरिवार पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित होतेे. तसेच अनाथ व गुणवंत विद्यार्थ्यांना वृत्तपत्राच्या वतीने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
समाजामध्ये वृत्तपत्राचे चांगले कार्य आहे - डॉ. सुनिल ब. गायकवाड
सध्या देशात एकत्र कुटूंब पद्धती नाहीशी होत आहे. ती होऊन नये एकत्र कुटूंब असणार्‍या कुटूंब प्रमुखाला सुद्धा यापुढे पुरस्कार देण्यात यावा तसेच या कार्यक्रमाला १०० टक्के प्रमुख पाहुण्यासह पुरस्कार स्विकारणार्‍या व्यक्तींची उपस्थिती आहे. यावरून लातूर मिशन वृत्तपत्र व शिवरत्न पुरस्काराचा दर्जा लक्षात येतो. हे कार्य अविरतपणे चालु रहावे. हे वृत्तपत्र समाजामध्ये चांगले काम करत असल्याचे मत माजी खा. डॉ. सुनिल बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केले.  
लातूर मिशन वृत्तपत्राचे काम कौतुकास्पद - शिक्षक आ. विक्रम काळे
लातूर मिशन वृत्तपत्राने गेल्या १० वर्षापासून बर्‍याच व्यक्तींना शिवरत्न पुरस्कार देऊन गौरविले असून वृत्तपत्राने निर्भिड पत्रकारीता केली आहे. मी वेळात वेळ काढून आवर्जुन या शिवरत्न पुरस्कार सोहळ्या उपस्थित राहून शुभेच्छा देतो. वृत्तपत्राचे काम खरोखरच चांगले असून यापुढेही असेच कार्य होत राहवो असे शिक्षक आ. विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अन्याय अत्याचार झाल्यास न्याय देण्याचे काम पत्रकार करतात - प्रतिभा पाटील कव्हेकर
लातूर मिशन वृत्तपत्राने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करत आहे. वृत्तपत्राचे देशात खुप मोठे योगदान आहे. वृत्तपत्र नसते तर आज अवस्था  काय असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. चांगली दिशा देण्याचे काम पत्रकार बांधव करतात. समाजातील प्रत्येक घडणार्‍या बाबीवर त्यांचे बारीक लक्ष असते. म्हणून वृत्तपत्राकडून मिळालेल्या शिवरत्न पुरस्काराचे महत्व खुप मोठे आहे. पुरस्कारार्थ्याची जबाबदारी आणखीन वाढली आहे. यापुढे आपल्या हातून चांगले कार्य होत रहावे असे भाषणात जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर म्हणाल्या.
पत्रकार सकारात्मक असेल तर काहीही होवू शकते - डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
या कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍या सर्वांचे अभिनंदन करून पत्रकारीता ही निर्भिडपणे सत्यात उतरवण्याची गरज आहे.  नुसतीच पत्रकारीता न करता सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळ्या शेत्रात जोहारी प्रमाणे निरखुन पुरस्कार प्राप्त व्यक्तीची निवड लातूर मिशनने केली आहे यामुळे पत्रकार सकारात्मक असेल तर कांहीही होते आणि लातूरच्या पत्रकारांची कार्यक्षमता फार सकारात्मक आहे म्हणून चांगल्या गोष्टी घडतात व ते सत्यपणे मांडतात असे डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रमाणिपणे पार पाडावी - अशोक चिंचोले
एखाद्या महाशक्तीला टक्कर देण्यासाठी समुह लागतो. एखाद्या कामाची दखल घ्यायची असेल तर तिसरा डोळा लागतो. तो म्हणजे लातूर मिशन वृत्तपत्र आहे. सर्व स्तरात योग्य काम करणार्‍या व्यक्तींना शिवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. एक समुह म्हणून उत्तम कार्य चालु आहे. यापुढे प्रत्येकाने आपआपली जबाबदारी प्रामाणिपणे पार पाडावी असे मत दै. भुकंपचे संपादक अशोक चिंचोले यांनी व्यक्त केले.
शिवरत्न पुरस्काराचा दर्जा खुप मोठा आहे - भारत जाधव
लातूर मिशन वृत्तपत्राचा दहावा वर्धापन दिन व लोकनेते विलासराव देशमुख यांचा साहेब यांचा स्मृती दिन वेगळ्या पद्धतीने केला जातो. विलासराव साहेबांनी कोणाचाच अणादर केला नाही. प्रत्येकाचा योग्य सन्मान केल्यामुळे त्यांच्या विचारांना साजेसा हा कार्यक्रम असून प्रत्येकाचा सन्मान व्हावा या सामाजिक बांधिलकीतून शिवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्याचे कार्य दरवर्षी केले जाते. यामुळेच शिवरत्न पुरस्काराचा दर्जा खुप मोठा असून याचे पावित्र्याची जपणूक सर्वांकडून व्हावी असे लातूर मिशनचे संपादक भारत जाधव प्रस्ताविक भाषणात म्हणाले.
आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकाच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मनपुर्वक आभार दिपक बोराडे पाटील यांनी मानले. यावेळी सुत्र संचलन बालाजी कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला उपसंपादक परमेश्‍वर घुटे, कार्यकारी संपादक सुरेश काचबावार, सल्लागार - प्रा. तानाजी घुटे, कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, गोविंद जगताप, ऍड. नामदेव शिंदे, दयानंद माने, शंकर जाधव, अमित तिकटे, कैलास ढोले, श्रीमंत होळे, विष्णु शिंदे, महेश राठोड, सादिक शेख, गणेश स्वामी, प्रा.विनोद चव्हाण, मनोज चव्हाण, प्रा.बालाजी वाघमारे, कुमार भालेराव, उमेश भिसे, केदार वांगसकर, महालिंग तटाळे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, दिपक बोराडे पाटील, तुकाराम जोगदंड, सोपान जाधव, अजित दुटाळ, बालाजी कांबळे, प्रदिप शिंदे, उमाकांत माळी, अनिल शेळके, दिपक शिंदे, शुभम चव्हाण, ओमकार सरडे, गणेेश पाटील, संतोष मगर, मंगेश आडे, दयानंद स्वामी,  सुरज मगर, गणेश भोसले, ईश्‍वर पानढवळे, लाला बोराडे, अर्जुन लोखंडे, परमेश्‍वर माचवे, अमर जाधव, प्रकाश चिंताले, लखन सावंत,  ऋषिकेश मोरे,  संपत भिसे आदींसह महिला वर्ग व प्रशासनातील कर्मचारी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم