विमुक्त भटके मुक्तीसंग्राम दिन यापुढे शासन स्तरावर साजरा व्हावाःहरिभाऊ गायकवाड

 विमुक्त भटके मुक्तीसंग्राम दिन यापुढे शासन स्तरावर साजरा व्हावाःहरिभाऊ गायकवाड


लातूर- शासनाने या पुढे ३१ ऑगस्ट हा दिवस विभक्त भटके मुक्तीसंग्राम दिन शासन स्तरावर साजरा करावा,अशी मागणी विमुक्त भटके व आदिवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड यांनी केली.
सिकंदरपूर,ता.लातूर येथील वडार वस्तीत अंगात चोळी नसलेल्या १०० पेक्षा अधिक वय असलेल्या शामाबाई गंगाराम ईटकर या वयोवृध्द महिलेच्या हस्ते तिरंगा झेंडा ङ्गडाकावून ७१ वा विमुक्त भटक्यांचा मुक्तीसंग्राम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी गायकवाड बोलत होते.अध्यक्षपदी कॉंग्रेस कार्यकर्ते महादेव गंभीरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक नेते रामराजे आत्राम, विमुक्त भटक्या आदिवासी महसंघाचे प्रदेश सरचिटणीस बाबुराव शेल्लाळे,ओबीसी नेते लक्ष्मणराव पोटे,विमुक्त भटक्यांचे युवा नेते प्रमोद गायकवाड, विकास गायकवाड,जयसिंग कतारी, अर्जून कतारी, विजय जाधव,सुनील गायकवाड, महादू गायकवाड, लिंबराज जाधव, भगवान चितोडीया, समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, कामराज गायकवाड, गंगाधर जाधव गुरुजी, भाई सुरवसे, पृथ्वीराज गिरी, पिराजी झाकणे, मारुती ईटकर, सुरज ईटकर, रामदास,भगवान ईटकर, गंगाराम लष्करे, शंकर ईटकर, पंडित पवार, दासू ईटकर, अनिल लष्करे, सुरेश लष्करे, सुभाष लष्करे, बाळू लष्करे, राजू ईटकर आदींची उपस्थिती होेती.
पुढे बोलताना हरिभाऊ गायकवाड म्हणाले की, १८७१ च्या गुन्हेगारी कायद्यानुसार देशातील वडार,कैकाडी, पाथरवट, पाथरुट, कंजारभाट, कोलाटी, पारधी,बेरड, पामलोर, रामोशी, छप्परबंद,भामटा, टांंकनखार, टकारी आणि भिल्ल आदिवासी समूहाला गुन्हेगार म्हणून ब्रिटीश सत्ताधार्‍याने तारेच्या कुंपणात बंदिस्त करुन ठेवले होते. कित्येक पिढ्या कुंपणातच बरबाद झाल्या आणि कित्येक कित्येक पिढ्या कुंपणातच जन्माला आल्या,कुंपणात जन्मलेल्या बाळांनाही जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपले म्हणणार्‍या भारत सरकारनेही या विमुक्त भटक्यांना तारेच्या कुंपणातून बाहेर न काढता ब्रिटीशाप्रमाणेच अमानुष छळ करत त्यातच डांबून ठेवले. यातून मुक्त होण्यासाठी बंदिस्त समूहातून मुक्तीसाठी उठाव होत होता. या संघर्षाची दखल घेत भारत सरकार नमले आणि पहिले प्रधानमंत्री प.ंजवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातील सोलापूर येेथे दि.३१ ऑगस्ट १९४७ ला स्वतःहजर राहून तारेचे कुंपण कापून विमुक्त भटक्यांना मुक्त केले होते, त्यावेळी तारेच्या कुंपणाबाहेर येवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता,देशाला १५ ऑगस्ट स्वातंत्र्य मिळाले असले तरी आम्हाला १७ दिवसांनी उशिरा मिळाले.तेव्हापासून हा दिवस विमुक्त भटके मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातोय,असे संागून तो शासकीय पातळीवर साजरा करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी रामराजे आत्राम, बाबुराव शेल्लाळे, महादेव गंभीरे, लिंबराज जाधव, भाई सुरवसे यांनीही विचार मांडले.कार्यक्रमाला वडार वस्तीतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم