उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाची हेळसांड थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाची हेळसांड थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन
   निलंगा : निलंगा तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड तात्काळ थांबवावी अन्यथा शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला उपजिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
       निलंगा शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात महिला वृद्ध व्यक्तींना डॉक्टर व कर्मचाऱ्याकडून योग्य वागणूक दिली जात नाही. महिला व वृद्ध व्यक्तींना सन्मानाची वागणूक द्यावी. निराधाराचे 21 हजाराचे उत्पन्न तात्काळ देण्यात यावे. तहसीलच्या आवारात ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी, अशा आशेचे निवेदन महिला आघाडी, युवासेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. पंधरा दिवसाच्या आत यावर कार्यवाही नाही झाल्यास महिला आघाडी व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वंजारवाडे, महिला तालुका संघटिका सविता पांढरे,शहर प्रमुख देवता सगर,शकुंतला पाटील,नसरीन शेख, रंजना कदम,नंदा गाडे,शिवसेना विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख, सतीश धायगुडे, सोनू नागमोडे,संजय जाधव, बबलू सरतापे इत्यादी शिवसैनिक, महिला युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم