राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल बॅडमिंटन संघ विजयी

राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल बॅडमिंटन संघ विजयी
विभागीय स्पर्धांसाठी पात्र      

 

लातूर/ प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मनपा आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उज्वल कामगिरी करत राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल चे बॅडमिंटन क्रीडाप्रकारातील १४ वर्ष व १७ वर्ष मुले दोन्ही संघ जिल्ह्यात सर्वप्रथम स्थानासह विजयी होऊन विभागीय स्पर्धांसाठी पात्र झाले आहेत.  

 

प्रथम स्थानासह विजयी संघांमध्ये (१७ वर्ष मुले) आदित्य चांडक, कृष्णा बागडे, राघव भार्गव, नील मंत्री, पार्थ खंडेलवाल तर १४ वर्षे मुले संघामध्ये आर्यन मालपाणी, स्पंदन वडगावकर, विवान गिल्डा, वंश नावंदर, वर्धन मुंदडा यांनी विजय मिळविला. सदरील सर्व विद्यार्थी व संघ विभागीय स्पर्धांसाठी पात्र झाले आहेत.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश लाहोटी, विश्वस्त अध्यक्ष श्री लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव श्री आशिष बाजपाई, शालेय समिती अध्यक्ष श्री आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू, यांनी सर्व विजयी संघ, विद्यार्थी, क्रीडा विभाग प्रमुख सुनील मुनाळे, शैलेन्द्र डावळे, सुनीता झुंजे, प्रियांका गडदे यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم