लिंगायतांच्या आरक्षणासाठी लिंगायत महासंघ राज्यभर निवेदने देणार
लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायतांना आरक्षण लागू करावे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकार्यांना तालुकास्तरावर उपजिल्हाधिकार्यांना किंवा तहसीलदारांना मंगळवार दि.03 ऑक्टोबर 2023 रोजी देण्यात येणार असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे म्हणून लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे अनेक वर्षापासून झटत आहेत. त्यांनी 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा आडवुन त्यांना आरक्षण देण्यास प्रवृत्त केले होते. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी बोलल्याप्रमाणे आरक्षणाचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी सरकारने नेमलेल्या लिंगायत नेते दिलीप सोपल यांनी समाजाची बाजु व्यवस्थीत मांडली नसल्यामुळे वाणी नावाला आरक्षण लागू झाले पण लिंगायत, हिंदु लिंगायत नावाने जातीची नोंद असलेल्या लाखो लिंगायतांना या आराक्षणाचा कसलाच फायदा झाला नाही. ते आरक्षण मिळावे म्हणून जुन्या काळातील नोंदीही तपासल्या गेल्या. परंतू त्या नोंदीही कुठे सापडल्या नाही. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या मुंबईतील बैठकीत प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यांनी एका महिन्यात हा प्रश्न निकाली काढू असे सांगितले आणि आजपर्यंत विसरून गेले. त्यामुळे वाणी नावाला लागु असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे ही मागणी घेवून लिंगायत महासंघ मंगळवार दि.3 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्यांना तालुकास्तरावरील उपजिल्हाधिकार्यांना किंवा तहसीलदारांना हे निवेदन देवून सरकारला लिंगायताच्या आरक्षणाची आठवण करून देण्यात येणार आहे. सरकार सरळ साध्या निवेदनाने जागे होणार नसेल तर लिंगायत महासंघ टप्याटप्याने आंदोलने करणार असल्याचे लिंगायत महासंघाने जाहीर केल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
إرسال تعليق