देवणी गोवंश संशोधन केंद्र परळीला, देवणीकरांमध्ये तीव्र नाराजी

देवणी गोवंश संशोधन केंद्र परळीला, देवणीकरांमध्ये तीव्र नाराजी 
 श्रीमिक क्रांती अभियान जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड यांचा जाहीर पाठिंबा 

देवणी : छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवणी गोवंश संशोधन केंद्राला परळी मतदारसंघात मंजुरी देण्यात आली. देवणी गोवंशाची पैदास व त्याचे संगोपण मात्र देवणी तालुक्यात होते. सदर संशोधन केंद्र देवणी तालुक्यातच व्हावे, या मागणीसाठी देवणी येथील सर्वपक्षीय नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. परळीचे केंद्र रद्द करून देवणीला मंजूर नाही केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर देवणी गोवंश संशोधन केंद्रासह दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात
आली. व विविध संघटनेने जाहीर पाठींबा देण्यात आले,निवेदनावर अॅड. अजित बेळकोने, अमित मानकरी, अटल धनुरे, सोमनाथ कलशेटे, आनंद जीवने, संजय रेड्डी, विजयकुमार लुल्ले, महेश जाधव, मनोज पाटील, गुंडप्पा बेलुरे, नरसिंग नागराळे, दशरथ कपडे, जावेद तांबोळी, नरहरी देवणीकर, माणिकराव लांडगे, रमेश ददापुरे, देवेंद्र मानकरी, दीपक मळभगे, राजू जगताप, योगेश तगरखेडे, चेतन मिटकरी, सोमनाथ लद्दे, रोहित बंडगर, भगवान बिरादार, नीळकंठ भोसले, दयानंद रोट्टे, मलिकार्जुन डोंगरे, शेषराव मानकरी, श्रीमंत लुले, गणेश बोंद्रे, वसंत पापने, शिवशंकर जीवने यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم