अनुभव शिक्षा केंद्र संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स शिबिराचे तिन दिवसांचे आयोजन
देवणी/ प्रतिनिधी- शहरात श्री योगेश्वरी देवी महाविद्यालय देवणी या ठिकाणी अनुभव शिक्षा केंद्र लातूरच्या वतीने सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर तीन दिवस असणार आहे या शिबिराप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हरकचे सर यांनी शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना या तीन दिवसीय शिबिर साठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर या शिबिरासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून विक्रमजी गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले. याप्रसंगी आपण हा शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगत असताना अनुभव शिक्षा केंद्राचे समन्वयक महादेव कोटे यांनी थोडक्यात प्रास्ताविक विद्यार्थ्यासमोर मांडले. प्रास्ताविकेमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून युवकांना नेतृत्व कौशल्य गुण घेऊन ते संविधानिक मूल्यांना आत्मसात करून स्वतः मध्ये बदल घडवण्याचा संकल्प व तसेच सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रक्रियेत लोकांना त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी युवकांनी सक्षम व्हावे यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी व तसेच वस्तीमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना ग्रामीण भागातील संसाधनाची ओळख व तसेच त्यांचे कार्य यासंदर्भात त्यांना माहिती करून देणे व गावात असलेल्या अनेक समस्यांना घेऊन त्या त्या विभागांमध्ये आपण सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देऊ शकतो या संदर्भात शासकीय प्रशासकीय बाबी आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगतो आणि ही प्रक्रिया युवकांनी पुढे घेऊन जाण्यासाठी आणि मूल्य आधारित युवक घडवण्यासाठी अशा अनेक प्रशिक्षणाची युवकांना गरज आहे व ही गरज लक्षात घेऊन आम्ही अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून युवकांना हे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे असे सांगण्यात आले. याप्रसंगी युवकांना त्यांचा परिचय व तसेच चळवळीच्या गीतातून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली या शुभारंभ प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक मलवाडे सर,महाका सर,घोणसे सर, हुमनाबादे सर, खिंडे सर, कांबळे मॅडम इत्यादी शिक्षिका उपस्थित होते.
إرسال تعليق