श्री अनंतपाळ वाचनालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा

श्री अनंतपाळ वाचनालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा
शिरुर अनंतपाळ/प्रतिनिधी :—शहरातील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालय शिरुर अनंतपाळ तालुका अ वर्ग वाचनालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.शिरुर अनंतपाळ येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री त्र्यंबक मुरुडकर यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्यसैनिक त्र्यंबक मुरुडकर यांचा वाचनालयाच्यावतीने वाचनालयाचे अध्यक्ष श्री एल.बी.आवाळे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार व ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला.यावेळी वाचनालयाचे सचिव डाॅ.राजकुमार बोपलकर,विरभद्र भातांब्रे गुरुजी,सत्यनारायण बंग,सौ.पदमा यरमलवार,वैजनाथ संभाळे,साहेबराव गायकवाड,ग्रंथपाल ग्रंथमित्र काशिनाथ बोडके,सहाय्यक ग्रंथपाल शिवनंदा चौंसष्टे,अनंत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم