आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
देवणी -  आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज, देवणी येथे 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजारोहण आणि कै.रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभ हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व मराठवाडा गीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा आईसाहेब सौ. लताताई गोविंदराव बिरादार, सौ. भामाबाई चंद्रकांत पंढरपूरे , सौ. संगीता निडवंचे, कै.रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के आणि आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज चे प्राचार्य राहुल बालूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
75 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत  चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेऊन अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा "मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शविली.

Post a Comment

أحدث أقدم