मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ औसा बंदची हाक.


मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ औसा बंदची हाक.
>>> सकल मराठा समाजाच्या तमाम युवकांच्या वतीने निषेधार्थ रॅली काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन..


औसा/ प्रतिनिधी : - जालन्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्या मराठा समाजाच्या मोर्चा आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जाच्या हल्ल्या निषेधार्थ दि. 2 सप्टेंबर  2023 शनिवार रोजी औसा शहर बंद ठेवत व्यापारी, शैक्षणिक संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाच्या तमाम युवकांनी निषेध व्यक्त करत मोठी रॅली काढून बंद चे आवाहन करत राज्याचे मुख्यमंत्रीना औसा तहसिलदारामार्फत सकल मराठा समाज शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. या संदर्भांमध्ये मराठा समाजाचे समन्वयक जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी बसले होते, मराठा समाज बांधवांतर्फे मराठा समाजास आरक्षण मिळावेे यासाठी शांतताामयरितीने उपोषण चालू होते, उपोषण सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून पोलीस बळाचा वापर करीत लाठीचार्ज करत त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यात महिला भगिनी व मुलांनाही मारहाण करण्यात त्यात अनेक जण जखमी झाले.  त्याचाच निषेध म्हणून आज औसा बंद ची हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. शांततेच्या मार्गाने मराठा समाज हा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शांतता पुर्व आंदोलन करत असतांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर  जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने ते आंदोलन उधळून लावला. त्या ठिकाणी पोलिस प्रशासनाने जो रात्री लाठीचार्ज करून त्यांच्यावर अनुषपणे मारहाण केली आहे. त्याच्याच निषेधार्थ आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने औसा कडकडीत बंद ची हाक दिली व उपोषणकर्ते, आंदोलकावर अमानुष रित्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसावर भादवि कलम 307 प्रमाणे गुन्हे दाखल करावे व घटनेचा तपास योग्य्य रीती करावा  यानंतर जर असंच यापुढेही जर राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत राहिलं तर त्याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर होणार आणि सरकारला त्याचीच जागा दाखवून दि्ल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्र मध्ये लाखोचे मराठा मोर्चा निघाले झाले. यामध्ये कुठल्याही मोर्चा मध्ये असा अमानुष, अनुचित प्रकार घडला नाही. हा प्रकार पहिल्यांदाच असा घडला असून ते आम्ही खपवून घेणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त केली गेली. येणाऱ्या आठ तारखेला तेथे 'महाराष्ट्र सरकार, आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तो कार्यक्रम यशस्वी होणार नाही म्हणून या मोर्चामुळे त्या कारणास्तव तिथं फक्त एक हजार तिथल्या गावातील बांधव होते. तर त्यांनी दीड हजार पोलीस फौज आणून उभा केली, आणि चारही बाजूंचे रस्ते बंद करून  अगोदर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आणि लहान मुलांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, येथे याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो मराठा सामाजाचा म्हणून घेतात त्यांनी लक्षात ठेवावे, व मराठा समाजाचा अंत पाहू नका, या प्रकरणामध्ये खरा दोष गृहमंत्र्याचा आहे अशा आरोपाची विनंती महाराष्ट्र शासनाला  करण्यात आली. या निवेदनावर पुरुषोत्तम नलगे, ॲड. श्याम मोरे, प्रदिप मोरे, गोपाळ धानुरे, बाबा थोरात, दत्ता कदम, विश्वास औटी, नितीन शिंदे, विशाल जगताप, मनोज लंगर, अविनाश पवार, प्रकाश माने, बालाजी माने, आकाश पाटील, नागेश मुगळे, यांच्यासह आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم