शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संबंध मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करा-विजयकुमार घाडगे पाटील

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संबंध मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करा-विजयकुमार घाडगे पाटील 
औसा/प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी औसा तालुक्यासह संबंध मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.1सप्टेंबर 2023 शुक्रवार रोजी औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग टाका पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून या मागणीसाठी छावा संघटनेसह संबंध शेतकरी बांधवांच्या उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना औसा तहसिलदार भरत सुर्यवंशी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

तालुक्यासह मराठवाड्यात पावसाचा लपंडाव सुरूच आहे. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. हजारो हेक्टर वरील सोयाबीन, तूर, मुग, उडीद, सुर्यफुल, कोथिंबीरसह खरीप हंगामाची पेरणी झालेली हातातून गेली आहे. तर काही शेतकऱ्यांची पिके उगवली नसल्याने शेतकऱ्यां समोर दुबार पेरणीचे संकट उभे झाले आहे.
पदरात हा खरीप हंगाम पदरात पडणार नाही सद्या पावसाचा खंड पाहता तसेच जून जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. विधनविहिरी, बोर यांनी तळ गाठला आहे.
गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत आभाळाकडे पाहता पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले परंतु आभाळातून पाण्याचे थेंब सुद्या आला नाही. याची दखल घेत तात्काळ शासनाने औसा तालुक्यासह मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करावा. जगाच्या पोशिंद्याला मायबाप सरकार म्हणून आपण दया दाखवून शेतकऱ्यांना सरसगट प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी आणि विमा कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा करावा. तसेच मागील वर्षीचा व चालू खरीपाचा २२/२३ पीक विमा शेतकयांच्या खात्यावर जमा करावा.  तालुक्यासह मराठवाड्यात विक्रमी शेतकरी आत्महत्येची नोंद होईल याला जबाबदार मुख्यमंत्री म्हणून आपण व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहतील याची नोंद आपण घ्यावी येणाऱ्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना दिवशी मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची बैठक घेऊन मराठवाड्यासाठी विशेष दुष्काळ निवारण निधी जाहीर करून प्रति हेक्टरी एक लक्ष प्रमाणे पॅकेज जाहीर करावे. या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्रींना औसा तहिलदार मार्फत निवेदन दिले.
यावेळी विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष भगवानदादा माकणे, मनोज लंगर, संजय राठोड, मनोज फेसाठे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अतुल हेळवे, नितीन साळुंके, पांडू कोळपे, रमाकांत करे, नामदेव जाधव, वैभव गोमसाळे, बालाजी माळी, समाधान यादव यांच्या निवेदनावर सह्या असून या निवेदनाची प्रत कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم