मातोळा सोसायटीच्या नूतन इमारतींचा भव्य उद्घाटन सोहळा

मातोळा सोसायटीच्या नूतन इमारतींचा भव्य 
उद्घाटन सोहळा
 औसा /प्रतिनिधी : - मातोळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचा भव्य 
उद्घाटन सोहळा शनिवार दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. महेश महाराज माकणीकर, महंत राजेंद्र गिरी महाराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालक आबासाहेब पाटील, संचालक ॲड.श्रीपतराव काकडे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर सह.कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, संचालिका सौ.स्वयंप्रभा पाटील, श्री संत मारुती महाराज सह.कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले, सरपंच सौ.आशा गोविंद भोसले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले  आदी.मान्यवरांच्या उपस्थित राहणार आहेत. 
  तरी तालुक्यातील शेतकरी सभासद व निमंत्रितांनी मातोळा सोसायटीच्या नूतन वास्तूचे भव्य उद्घाटन होणार आहे.याप्रसंगी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन व्यंकट अंबादास भोसले,व्हाईस चेअरमन गणेश भोसले, सचिव व्ही.आर.मदने, संचालक मंडळ  धनंजय भोसले, सयाजी दारफळकर, अजित भोसले, व्यंकट मोरे, राजेंद्र भोसले, विक्रम भोसले, मुकुंद भोसले, दत्ता सूर्यवंशी, गजानन माळी, सौ. वत्सलाबाई भोसले, सौ. वर्षा आनंदगावकर, सिंधू गायकवाड यांनी केले आहे..

Post a Comment

أحدث أقدم