रामनाथ विद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत वर्चस्व कायम

 रामनाथ विद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत वर्चस्व कायम 
आलमला/प्रतिनिधी:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता.औसा येथील विद्यालयाने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहेे. .दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी भुसणी ता. औसा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांनी आपापल्या वजन गटात व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम प्राप्त केला असून कुस्ती स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे . त्यात 14 वर्षे वयोगट व वजन गट पुढील प्रमाणे आहे .राठोड गीता 30 , आडे ऋतिका 33,कदम समृद्धी 36, पवार वैष्णवी 54, राठोड अनिता 58,चव्हाण काजल 46, 17 वर्ष वय व वजन गट पुढील प्रमाणे ज्योती जाधव 40, राठोड पुनम 43, आडे ममता 53, पवार पूजा 57, कदम साक्षी 46, इनामदार आयेशा 61, या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे . जाधव शुभम 48, मुळे शुभम 43, मुळे ओमकार 73 किलो वजन गटात जिल्ह्यात द्वितीय आलेले आहेत. या यशस्वी मुलांनी विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून श्री रामनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रंगनाथ आंबुलगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. उमेश पाटील,उपाध्यक्ष शिवाजी आंबुलगे , सचिव प्रभाकर कापसे, कोषाध्यक्ष चनबसप्पा निलंगेकर, सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक पी.सी. पाटील, रामनाथ विद्यालयाचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

Post a Comment

أحدث أقدم