स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह.खरेदी विक्री संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह.खरेदी विक्री संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
उदगीरःयेथील स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह.खरेदी विक्री संघाची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि:२८|०९|२०२३ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.रामचंद्रराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे चेअरमन भरतभाऊ चामले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली.संस्थेच्या विषय सुचीचे संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक मारोती बिरादार यांनी वाचन केले.
       लातूर जिल्हाबँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर यांनी मोलाच्या मार्गदर्शक सुचना केल्या.तद्नंतर संस्थेचे चेअरमन भरतभाऊ चामले यांनी उदगीर,जळकोट,चाकूर, देवणी व शि.अनंतपाळ या ठिकाणाहून आलेल्या सर्व उपस्थित सभासदांचे सहृदय आभार मानले.
          यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन शंकरराव पाटील,संचालकःरामराव मामा बिरादार,व्यंकटराव पाटील, किशनराव हरमुंजे सर, विठ्ठलराव मुळे,बाबासाहेब काळेपाटील,प्रभूराव पाटील, वसंतराव सोनकांबळे,मारोती पवार, मालनबाई कोनाळे,रूक्मिनबाई बिरादार इत्यादी उपस्थित होते.तसेच स्वातंत्र्य सैनिक तुकाराम चामले, कृषिउत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे सभासद व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم