'विवेक वर्धिनी'त शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाचा गौरव

'विवेक वर्धिनी'त शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाचा गौरव
देवणी:  येथील विवेक वर्धिनी प्राथमिक शाळेत दि. ५ सप्टेंबर सर्वपल्ली डॉ राधाकृष्णन याची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून येथील शिक्षक गुणवंत किशनराव कदम यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विनायक पाटील यानी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या नावाने आदर शिक्षक म्हणून शाल श्रीफळ, टोपी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्था
सचिव भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुने म्हणून लोकजागृती शिक्षण सह सचिव नागोराव भोसले, माजी मुख्याध्यापक रामराव राठोड, संचालक बाबुराव बिरादार, व्यंकटराव काळे, जि. प. माजी बांधकाम सभापती नागेश जिवणे, सलीम उंटवाले आदी उपस्थित होते. या मुख्याध्यापक विनायक पाटील बटनपूरकर यानी केले. तर सुत्रसंचलन शंकरराव बिरादार यानी केले आभार सरोजा सुर्यवंशी यानी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शोभा पाटील, उर्मिल घोनशेटवार, अण्णाराव मोरे, रावसाहेब पाटील, यानी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم