विलास कारखानातील मील रोलरचे चेअरमन वैशाली देशमुख यांच्या हस्ते पूजन

विलास कारखानातील मील रोलरचे चेअरमन वैशाली  देशमुख यांच्या हस्ते पूजन
लातूर/ प्रतिनिधी :विलास सहकारी साखर कारखाना युनिट वैशालीनगर, निवळी येथील कारखान्याच्या
अंतर्गत आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत बसविण्यात आलेल्या नवीन
मील रोलरचे विधीवत पुजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विलास सहकारी साखर कारखाना लि.ची येणाऱ्या गळीत हंगामाची जय्यत तयारी
सुरू आहे. या अनुषंगाने कारखान्यात नवीन बसविण्यात आलेल्या मील रोलरचे
पुजन बुधवार, दि.  ६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना साईट
वैशालीनगर, निवळी येथे कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांच्या हस्ते सर्व संचालकाच्या उपस्थिती करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव
देसाई संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे,
गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोविंद डुरे,
अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, ज्ञानोबा पडिले आदी
उपस्थित होते.

विलास कारखाना येथे आधुनीकीकरण
गाळप क्षमतेत वाढ व साखरेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार

वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणेचे तंत्रज्ञ यांनी विलास सहकारी साखर
कारखाना, वैशालीनगर निवळी येथे प्रत्यक्ष भेट देवुन मशिनरीची पाहणी केली.
गळीत हंगामामध्ये या मशिनरीमुळे होत असलेले स्टॉपेजेस, तसेच गाळप हंगामात
मशिनरी बंद पडणे इत्यादीचा विचार करून इंजिनिअरींग व उत्पादन विभागातील
मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल करणे, नवीन मशिनरी बसविणे व काही
मशिनरीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याबाबत कळविले होते. त्याअनुषंगाने
इंजिनिअरींग व उत्पादन विभागाचे आलेल्या अहवालाचा विचार करून मील विभाग,
बॉयलर हाऊस, शुगर ग्रेडर मध्ये आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यामुळे
तांत्रिक कार्यक्षमतेत व साखरेच्या गुणवत्तेत सुधारणा होणेसाठी तसेच
वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे यांचे सुचनेप्रमाणे कारखाना मशिनरीमध्ये
बदल करून आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. मशिनरी आधुनिकीकरणामुळे
कारखाना मॅटेन्स खर्चात बचत होऊन, कारखाना कार्यक्षमतेने चालणार आहे.
कारखाना आधुनीकीकरणाचे काम अंतीम टप्प्यात असून या तांत्रिक बदलामुळे
गाळप क्षमतेत वाढ व साखरेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. पर्यायाने
यामुळे ऊसाचे वेळेवर गाळप आणि ऊसदर सुध्दा चांगला देणे शक्य होणार आहे.

विलास सहकारी साखर उदयोग
सर्वांगीण ग्रामविकासाचा पथदर्शी प्रकल्प

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना परिवारातील हा
साखर कारखाना आहे. या कारखान्याचे युनीट नं. २ तोंडार ता.उदगीर येथे आहे.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी
दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री,
आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव
देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी
साखर कारखाना प्रारंभीपासून यशस्वी वाटचाल करीत आहे.

विलास कारखाना सहकार क्षेत्राचा सन्मान

कोणताही एकटा ऊसउत्पादक शेतकरी किवा काही ऊसउत्पादक शेतकरी एकत्र येऊन
साखर उदयोग ऊभारणी करू शकत नाहीत. पण कतृत्ववान नेतृत्व लाभल्यास शेतकरी
साखर उदयोगाचा व्यवस्थापक होऊ शकतो यांचे उदाहरण म्हणजे विलास सहकारी
साखर कारखाना होय. हा कारखाना ऊभारणी पासूनच यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
येणाऱ्या गळीत हंगाम २३-२४ साठीची अंतर्गत तांत्रीक व साफसफाईची कामे
वेळेवर केली गेली आहेत, ही सर्व कामे अंतीम टप्प्यात आली आहेत. यापूढील
हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे वेळेवर गाळप करता यावे यासाठी नवीन मील रोलर
बसविण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली.
तर कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी कारखाना पूर्ण
क्षमतेने चालवून ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊसातोडणी व वाहतूक
यंत्रणाची उभारणी करण्यात आली आहे, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन
रविंद्र काळे यांनी सांगीतले.
कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी कारखाना
अंतर्गत सुरू असलेल्या कामाची व कारखाना उभारणी केलेल्या नवीन मील रोलर
कामाची पाहणी करून माहीत घेतली. तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत खाते
प्रमुख, विभाग प्रमुख व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
कारखान्यात नवीन बसविण्यात आलेल्या मील रोलरचे पुजन कार्यक्रमास विविध
संस्थाचे पदाधिकारी, कारखान्याचे ऊसउत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी.उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم