आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज चे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत मारली बाजी

आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज चे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत मारली बाजी
  देवणी : तालुक्यातील वलांडी येथील श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालय वलांडी येथे शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगट मुली मध्ये इयत्ता सहावी वर्गातील कु.प्रांजली गोविंद सपकाळे या मुलीने 600 मिटर धावने यात प्रथम क्रमांक तर 200 मिटर धावने यात द्वितीय क्रमांकावर बाजी मारली तसेच 19 वर्ष वयोगटातील इयत्ता अकरावी मधील विद्यार्थीनी कु. साक्षी बाबासाहेब कांबळे हिने 3000 मिटर धावने यात पहिला क्रमांक पटकिवला. शाळेचे क्रीडा शिक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव तालुका स्तरावर नोदवून शाळेची शान ठेवली, असे उद्गार काढत जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था साचिव गजानन भोपणीकर यांनी विद्यार्थिनिंचे व क्रीडा शिक्षक यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांनी विध्यार्थीनीचे कौतुक केले. शाळेचे प्राचार्य राहुल बालुरे यांनी जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांवर अभिमानास्पद प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले व तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोघींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. 
या यशामुळे शाळेत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते व तसेच पालकांनी सुध्दा आनंद व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم