अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसदिनी १ लाखाची ग्रंथसंपदा भेट

अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसदिनी १ लाखाची ग्रंथसंपदा भेट
लातूर : भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणा-या स्वामी विवेकानंद विद्यालयातील समन्वयक तथा प्राचार्य मारूती सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यातील चार सामाजिक संस्थांना एक लाख रुपयांच्या ग्रंथांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, फायनान्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे, एमएनएस बँकेचे उपकार्यकारी संचालक किशनसिंह गहिरवार आदी उपस्थित होते. वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार नागरिकांचे वाचन वाढावे,त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेमध्ये चांगली वाढ व्हावी, या दृष्टीकोनातून स्वामी विवेकानंद विद्यालयातील समन्वयक प्राचार्य प्रा. मारूती सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून मातोश्री वृध्दाश्रम, सेवालय, खुशी फाऊंडेशन, आईचं घर या सामाजिक संस्थाना एक लाख रूपयाच्या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, प्राचार्य शेख यांनी केले.राजकुमार साखरे, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य शिरीन शॅमसन, डॉ. शैलेश कचरे, प्राचार्य लबडे, प्राचार्य बोंडगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم