रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्यास सांगू नका - आ. देशमुख यांची ताकीद

रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्यास सांगू नका - आ. देशमुख यांची ताकीद
लातूर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणारे हब निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना माजीमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली तसेच रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.
आ. अमित देशमुख यांनी शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्याचा व विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. बैठकीच्या प्रारंभी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी महाविदयालयात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहीती दिली. महाविदयालयातील शैक्षणिक सुधारणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी तसेच रुग्णावर उपचार करण्यासाठी उभारावयाच्या सोयी सुविधांच्या माहिती त्यांनी सादर केली. डॉ. उदय मोहिते यांनी या महाविदयालयाच्या उभारणी संबंधी माहिती दिली. आ. देशमुख वैदयकीय शिक्षण मंत्री असतांना या महाविदयालयात २५० ते ३०० कोटी रूपये खर्चाचे प्रकल्प मंजूर झाले. त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यांच्या पाठपुराव्यातून आणखी २५० कोटींचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यांचीही कामे लवकरच सुरू होतील.

Post a Comment

أحدث أقدم