मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित स्पर्धेत जि.प.सारोळा शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित स्पर्धेत जि.प.सारोळा शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

औसा/प्रतिनिधी-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत जि.प. प्रा.शाळा सारोळा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे झालेल्या विविध तालुकास्तरीय स्पर्धेत जि. प. प्रा.शाळा सारोळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सर्वच स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला .यामध्ये १)समूहनृत्य स्पर्धा (५वी ते ७वी गट) (कु. प्रतिक्षा स्वामी, संध्या साळुंके श्रुती सिरसाट, श्रावणी जाधव, अल्फिया लतीफ शेख, अल्फिया खुदबुद्दीन शेख ), प्रथम क्रमांक-२) वक्तृत्व स्पर्धा (५वी ते ७वी गट )कु. स्नेहा संतोष सिरसाट प्रथम क्रमांक,३) रांगोळी स्पर्धा (५वी ते ७वी गट)याशिवाय बीट स्तरावर प्रथम क्रमांक तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा सारोळा शाळेने तेथे ही आपला ठसा उमटवला आहे .यामध्ये निबंध स्पर्धा (६वी ते ८वी गट)- १) कु. श्रेया संतोष जाधव. प्रथम क्रमांक२) कु. भक्ती बंडू मुळे द्वितीय क्रमांक-निबंध स्पर्धा (१ली ते ५वी गट) पृथ्वीराज सिद्धार्थ लोखंडे प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तर, बीट स्तर जिंकून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.यामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व ग्रामस्थांतर्फे कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم