क्रांतिवीर दत्तोबा भोसले स्मृती चषक स्पर्धेस भरभरून प्रतिसाद

क्रांतिवीर दत्तोबा भोसले स्मृती चषक स्पर्धेस भरभरून प्रतिसाद
लातूर:औसा तालुक्यातील देवताळा येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमाने क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवताळा व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर दत्तोबा भोसले स्मृती चषक पुरुष व महिला खुल्या कबड्डी स्पर्धा 2023चे आयोजन करण्यात आले होते. 
या स्पर्धेत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालये व क्रीडा मंडळांनी प्रथमच पावसाळा असुनही मोठा प्रतिसाद दिला. अडोतीस पुरुष संघ व बारा महिला संघ यांनी वीस पंचाच्या उपस्थितीतीत उत्कृष्ट कबड्डी खेळाचे प्रदर्शन केले. 
प्रारंभी दूरस्थ संपर्क पद्धतीने सतिश चव्हाण पदवीधर आमदार मराठवाडा विभाग यांनी औरंगाबाद येथून व विवेकानंद दत्तोबा भोसले यांनी प्रवासात असताना चीनमधून सर्व सहाशे खेळाडूंना जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राजेंद्र गिरी महाराज, माणिक चव्हाण सरपंच, संतोष आनंदगावकर ,नामदेव माने व व्यंकट कोव्हाळे पोलीस फौजदार यांनी पाच वेगवेगळ्या पाच कबड्डी ग्राउंडचे उद्घाटन केले. दिवसभर झालेल्या कबड्डी स्पर्धेतील निकालात पुरुष गट प्रथम जय हनुमान क्रीडा मंडळ रेनापुर ,द्वितीय शिंगोली क्रीडा मंडळ शिंगोली ,तृतीय सेवाभाया कबड्डी संघ काटगाव व शिव पार्वती क्रीडा मंडळ वाघोली. अष्टपैलू खेळाडू प्रदीप आकनगीरे उत्कृष्ट चढाई साहिल जरटकर भूम, उत्कृष्ट पकड रितेश राठोड सत्तरधरवाडी ,शिसस्तबद्ध संघ बावीस यांनी अकरा हजार, सात हजार, पाच हजार रुपये व स्मृतीचिन्ह मिळविले.तर विशेष खेळाडू व संघ म्हणून अकराशे रूपये व स्मृतीचिन्ह पटकावले. 
महिला गटात प्रथम कबड्डी संघ जय हनुमान क्रिडा मंडळ रेणापूर, द्वितीय कबड्डी संघ स्वराज्य क्रिडा मंडळ निलंगा, तृतीय कबड्डी संघ भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा व उत्कृष्ट चढाई अंजली चौधरी, उत्कृष्ट पकड श्रुती सुरवसे,अष्टपैलु खेळाडू उदिता चव्हाण आणि शिस्तबद्ध संघ राजाराम संघ कुस्ती हे ठरले यांना अनुक्रमे रु अकरा हजार रुपये, रुपये सात हजार , रुपये पाच हजार व प्रत्येकी अकराशे रुपये व स्मृतीचिन्ह अशी बक्षिसे पटकावली. 
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ दौलतराव घोलकर लोहारा,रोहन जगताप कमलाकर सावंत, नितीन कदम, तानाजी चव्हाण , अमर टेकाळे अकॅडमी वरील सर्व विद्यार्थी तसेच सर्व पंच प्रतिनिधी लक्ष्मण बेल्लाळे व शिवराम शिंदे कबड्डी असोसिएशन लातूर व उस्मानाबाद यांनी सहकार्य केले.
या कबड्डी स्पर्धा अतिशय नियोजन पद्धतीने पार पडल्या. शेवटच्या अत्यंत चुरशीच्या कबड्डी लढती पाहून क्रिडाप्रेमींनी अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित कराव्यात अशी मागणी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم