लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत

लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत
लातूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर महानगरपालिका हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक गोरख दिवे (दूरध्वनी क्र. 220100,  भ्रमणध्वनी क्र. 9823090890, ई-मेल आयडी psmidc405@gmail.com), लातूरचे नायब तहसीलदार भिमाशंकर बेरुळे  (दूरध्वनी क्र. 242962, भ्रमणध्वनी क्र. 7588692461, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), लातूर महानगरपालिकेचे ए झोन अधिकारी कलीम शेख (दूरध्वनी क्र. 246075, भ्रमणध्वनी क्र. 9011032404, ई-मेल आयडी mclatur@gmail.com) यांचा समावेश असणार आहे.
शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक दिलीप सागर (दूरध्वनी क्र. 243100, भ्रमणध्वनी क्र. 9552664300, ई-मेल आयडी- psshivajinagar@gamil.com), नायब तहसीलदार कुलदिप देशमुख (दूरध्वनी क्र. 242962, भ्रमणध्वनी क्र. 9890081635, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), लातूर महानगरपालिकेचे बी झोन अधिकारी विजय राजुरे (दूरध्वनी क्र.  246075,  भ्रमणध्वनी क्र. 9011010777, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com) यांचा समावेश आहे.
विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (दूरध्वनी क्र.  258100, भ्रमणध्वनी क्र. 7350652345, ई-मेल आयडी- psvivekanandchowk405@gamil.com),  नायब तहसीलदार श्रीमती सविता माडजे (दूरध्वनी क्र.  242962, भ्रमणध्वनी क्र. 8805583307, ई-मेल- आयडी- laturtahsildar@gmail.com), लातूर महानगरपालिका सी झोन अधिकारी पवन सुरवसे (दूरध्वनी क्र. 246075, भ्रमणध्वनी क्र. 9595272692, ई-मेल- mclatur@gmail.com) यांचा समावेश राहील.
गांधी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे (दूरध्वनी क्र.  242100, भ्रमणध्वनी क्र. 9284288517, ई-मेल आयडी- psgandhichauk405@gamil.com), उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार सुधीर देशमुख (दूरध्वनी क्र. 243462, भ्रमणध्वनी क्र. 9960099747, ई-मेल आयडी- latursdm@gamil.com), महानगरपालिका डी झोन अधिकारी बंडू किसवे (दूरध्वनी क्र. 246075, भ्रमणध्वनी क्र. 9011032302, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com यांचा समावेश आहे.

Post a Comment

أحدث أقدم