मुक्तांगणच्या गोविंदाने फोडली दहीहंडी

मुक्तांगणच्या गोविंदाने फोडली दहीहंडी

लातूर : प्रतिनिधी- येथील विशालनगर परिसरातील साई मंदिरासमोरील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून बालगोपाळांसाठी दहीहंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन कविता लाटे, शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी शाळेच्या शिक्षिका यांनी दहीहंडीसंदर्भात माहिती दिली. दहीहंडी हा उत्सव कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. गोपाळकाला कसा बनवायचा, याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले.

गोविंदा आला रे, गो गो गोविंदा, चांदी की डाल पर सोने का मोर या गीतांवर चिमुकल्यांनी ठेका धरला. शाळेच्या गोविंदानी मनोरा रचून या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. या प्रसंगी कृष्णाच्या वेशभूषेत तर राधाच्या वेशभूषेत या विद्यार्थिनी होत्या. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीच्या व दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर सर्व बालगोपाळांनी गोपाळकाल्याचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم