रेणापूर येथील मराठा आरक्षण आंदोलनास आ. कराड यांची भेट; पाठिंबा जाहीर

रेणापूर येथील मराठा आरक्षण आंदोलनास आ. कराड यांची भेट; पाठिंबा जाहीर
        लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रेणापूर येथे चार जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळास भाजपाचे नेते विधान परिषद सदस्य आ. रमेशआप्पा कराड यांनी आज मंगळवारी भेट देऊन जाहीर पाठिंबा असल्याचे बोलून दाखविले.

          वर्षानू वर्ष मराठा आरक्षणासाठी लढा देऊनही प्रत्यक्षात आरक्षण मिळत नसल्याने जालना जिल्ह्यात अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात योगेश देशमुख, संतोष शिंदे, अजय गाडे, धनजय भोसले हे चार तरूण गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत.

        मराठा समाजाच्या मागण्या रास्त आणि योग्य असल्याने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी दुपारी रेणापूर येथील उपोषण स्थळास भेट दिली. उपोषणकर्त्याच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका माझी आणि भारतीय जनता पार्टीची आहे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की उपोषणकर्त्याची मागणी ही वैयक्तिक नसून समाजाच्या हिताची आहे. दिले जाणारे आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे, तशाच पद्धतीचे आरक्षण लागू व्हावे या प्रश्नासंदर्भात जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे जाहीर भूमिका मांडून मराठा समाजाच्या मागण्या सोबत आम्ही आहोत हे दाखवून देऊ असे स्पष्टपणे बोलून दाखवले.

         यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, प्रदेश सदस्य अनिल भिसे, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, संभाजी सेनेचे सुधाकर माने, शिवसेनेचे सचिन दाने, कुलदीप सूर्यवंशी, दीपक पवार, शरद दरेकर, चंद्रकांत कातळे श्रीकांत सूर्यवंशी, संतोष चव्हाण, दत्‍ता सरवदे नवनाथ माने, विजय घोडके, गोविंद पाटील, डी. एस. पाटील, महेश सूर्यवंशी, किशन क्षिरसागर, अँड खाडप यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم