लातूर जिल्हा बँकेला उत्कृष्ट पुरस्कार हा तर सहकारातील लातूर पॅटर्न

लातूर जिल्हा बँकेला उत्कृष्ट पुरस्कार हा तर सहकारातील लातूर पॅटर्न
लातूर जिल्हा बँकेला उत्कृष्ट पुरस्कार हा तर सहकारातील लातूर पॅटर्न
 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हंटले की राज्यात टॉप चार मध्ये असलेली लातूर जिल्हा बँक अशी ओळख आहे या बँकेने गेल्या ३५ वर्षात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या योजना राबवून शेतकरी, सहकारी पतसंस्था,  साखर उद्योग, मजूर संस्था, गृहनिर्माण संस्थांना आर्थिक मदत केल्याने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज जिल्ह्यांतील सर्वसामान्यापासून ते सहकारी संस्था शेतकऱ्यांची मातृ संस्था म्हणून ओळखली जाते त्याला कारण पण आहे एकेकाळी बँकेला कर्मचाऱ्यांना पगार द्यायला संचालक मंडळाकडे पैसा नसणारी लातूर जिल्हा बँक आज कर्मचाऱ्यांना चांगला पगार देत दरवर्षी दिवाळीला बोनस म्हणून एक पगार देते हे करीत असताना बँकेने कधी राजकारण केलं नाही बँकेने मागेल त्याला कायदेशीर प्रक्रिया राबवून सर्वांना कर्ज वाटप करून वेळेवर वसुली करत आज ९८% वसुली करत अग्रेसर आहे सातत्याने गेली १५ वर्षापासून आलेख चढता राहिलेला आहे जिल्हा बँकेला आजतागायत देशपातळीवरील, राज्य स्तरावरील, राज्य शासन, असे २९ पुरस्कार मिळवनारी लातूर बँक मराठवाड्यात व विदर्भातील पहिली तर राज्यातील पहिल्या पाच टॉप बँकांमध्ये आहे बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहकारी संस्था, साखर कारखाने, पगारदार कर्मचाऱ्यांना गृह कर्ज , शैक्षणीक कर्ज, पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज रेशीम उद्योगसाठी २ लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज अशा विविध योजना राबवत जिल्ह्यातील मातृत्व संस्था म्हणून ओळखली जावू लागली आज या लातूर बँकेला मराठवाडा विभागात उत्कृष्ठ जिल्हा बँक म्हणून नाशिक येथे राज्य सहकारी बँक्स असोसिएशन कडून गौरविण्यात आले हा लातूर बँकेचा सहकारातील पॅटर्न म्हणुन लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
लातूर बँक मातृत्वाची भूमिका
राज्यातील अनेक जिल्हा बँका मोजक्या चांगल्या स्थितीत आहे त्यात लातूरचा समावेश आहे लातूर जिल्हा बँकेने शेतकऱ्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले त्यामुळे इथली शेती सुधारली उसाचे क्षेत्र वाढले साखर कारखाने ऊभे झाले ते जिल्हा बँकेच्या मदतीने साखर कारखानदारी चांगली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली मांजरा, रेणा,जागृति, रेणा, मारुती महाराज, विलास साखर कारखाना हे साखर कारखान्यास जिल्हा बँकेने मदत केली आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम जिल्हा बँक व मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने यांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे हे विसरून चालणार नाही जे सत्य आहे ते नाकारू शकत नाही त्यामुळे जिल्ह्यातील विविध संस्था, सहकारी साखर कारखानदारी मजूर संस्था गृहनिर्माण संस्थांना आर्थिक मदत जिल्हा बँकेची राहिलेली आहे आजही जिल्ह्यातील विविध संस्थांना आर्थिक मदत केली जात आहे एक पारदर्शकता ठेवून अचूक कार्य करणारी मातृ संस्था म्हणून जिल्हा बँकेकडे लोकांचे लक्ष नेहमी असते त्यांचे श्रेय लोकनेते विलासराव देशमुख साहेब माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कडे जाते आज राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख अतिशय चांगल्या योजना राबवून शेतकरी सहकारी पतसंस्था पगारदार कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत वेगवेगळे निर्णय घेत लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहे..

Post a Comment

أحدث أقدم