उम्मे कुलसुम व हाजरानाज विद्यापीठात द्वितीय व तृतीय उम्मेकुलसुम हीस विद्यापीठात सुवर्ण पदक

उम्मे कुलसुम व हाजरानाज विद्यापीठात द्वितीय व तृतीय उम्मेकुलसुम हीस विद्यापीठात सुवर्ण पदक
आझाद महाविद्यालयाचे विद्यार्थीनींना विद्यापीठाचे सुवर्णपदक

औसा :- आझाद महाविद्यालयातील कु उममेकुलसुम निजामोदीन शेख व कु हाजरानाज अफसर शेख या दोन विद्यार्थीनी विद्यापीठात बी. एस.सी. विद्या शाखेत अनुक्रमे सर्वद्वितीय व सर्वतृतीय आल्यामुळे  व सुक्ष्म जीवशास्त्र विषयात कु उम्मेकुलसुम हीने विद्यापीठात  प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल व याद्वारे  महाविद्यालयाची आणि संस्थेची मान उंचावल्याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार करून रोख पारितोषिके, सन्मानपत्र व पदके देण्यात आली. त्यासाठी भव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  निजामोद्दीन शेख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा येथील प्राचार्य डाॅ.माधव कोलपुके तसेच संस्थेच्या सहसचिव सौ.गजालाताई अफसर शेख, युवानेते सुलेमान शेख उपस्थित होते.
महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थींनी कु. उमेकुलसुम निजाम शेख आणि कु.हाजरानाज अफसर शेख यांनी सत्कारास उत्तर देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. एन. बी. शेख यांच्या कठोर परिश्रम, शैक्षणिक कार्यातून प्रेरणा घेऊन तसेच प्राचार्य व प्राध्यापकांच्या मार्गदर्शन यातुन अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे यशप्राप्ती मिळाल्याचे सांगितले.
प्राचार्य डाॅ. मासुमदार सरांनी महाविद्यालयाला विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत येण्याची अखंड परंपरा असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब इंगळे,  सूत्रसंचालन प्रा.मजहर कोतवाल व प्रा. गायकवाड मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन डाॅ. सय्यद निसार यांनी मानले.या प्रसंगी संसथेचया संस्थापिक सदस्या सौ जुलेखाबेगम नवाबोद्ददीन शेख यांनी गुणवंत दोघांना  शुभाशिर्वाद दिले 
कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंताना संस्थासचिव डाॅ. अफसर शेख यांनी विशेषरित्या सन्मानित केले.

Post a Comment

أحدث أقدم