शिरूर अनंतपाळ येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन

शिरूर अनंतपाळ येथे  एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन
शिरूर अनंतपाळ : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त 'साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ व श्री अनंतपाळ नूतन विद्यालय शिक्षण समिती शिरूर अनंतपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ९ सप्टेंबर रोजी शिरूर अनंतपाळ या ऐतिहासिक व धार्मिक नगरीत मोरया लॉन्स या मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पहिले एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण महर्षी प्रभाकरराव कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या साहित्य संमेलनानिमित्त शिरूर अनंतपाळ शहरातून शनिवारी सकाळी ७.३० वा ग्रंथदिंडी निघणार असून या ग्रंथ दिंडीचे उदघाटन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मायावती गणेश धुमाळे व उपनगराध्यक्षा सौ. सुषमा बस्वराज मठपती यांच्या हस्ते बसवेश्वर चौक येथे करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यीक धनंजय गुडसूरकर राहणार आहेत. या मराठी

साहित्य आणि संस्कृती सक्छन मडळ शिरुर अन पत्रकार परिषद

साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर या साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील हे करणार आहेत.

या मराठी साहित्य संमेलनाला

मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची उपस्थिती राहणार आहे.

मराठवाडा मुक्ती लढा या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते माजी प्राचार्य तथा सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांचे व्याख्यान होणार आहे.

यावेळी या सत्राचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. नारायण सूर्यवंशी यांची उपस्थिती राहणार असून या मराठी साहित्य संमेलनाच्या दुपारच्या सत्रात कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समारोप सायंकाळी ५ वा. होणार आहे. एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभाकर कुलकर्णी यांनी केले आहे. यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेवराव जगताप, कार्याध्यक्ष भारत कोंडेकर, उपाध्यक्ष सुर्यकांत येरोळकर, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे, उपाध्यक्ष गुरुनाथ शिंदाळकर, सचिव प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, इंजि. किरण कोरे व संयोजन समितीचे पदाधिक
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई निसार तांबोळी, स्वा. रा.ती.म. विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم