रामनाथ विद्यालयात" शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची " विषयावर व्याख्यान संपन्न

रामनाथ विद्यालयात" शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची " विषयावर व्याख्यान संपन्न
 आलमला-तालुक्यातील  रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये "शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रामाची "या विषयावर व्याख्यान शिक्षण विभाग जि प, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन लातूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते . सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती चळवळीचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अडवोकेट उमेश पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बी आर पाटील अध्यक्ष दक्षिण मराठवाडा विभाग ज्येष्ठ नागरिक संघ ,श्री शिवाजी अंबुलगे उपाध्यक्ष, श्री प्रभाकर कापसे सचिव उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी श्री भाऊसाहेब उमाटे हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते .प्रथम मान्यवरांचा संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव अंबुलगे सचिव प्रभाकर कापसे यांनी संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमांमध्ये रामनाथ शिक्षण संस्थेचे संबंधित व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल प्राध्यापक नंदकिशोर धाराशिवे एस.एम. बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगनक विभागाचे विभाग प्रमुख झाल्याबद्दल, प्राचार्य कैलास कापसे वैद्यकीय क्षेत्रात पी.एच.डी मिळवल्याबद्दल तसेच श्रीमती जयश्री खराबे या अलमला केंद्राच्या केंद्रप्रमुख झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी प्रमुख व्याख्याते श्री भाऊसाहेब उमाटे यांनी मराठवाडा मुक्त होण्यासाठी अनेक योध्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून मराठवाडा मुक्त होण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय सर्व विद्यार्थ्यांच्या समोर सविस्तरपणे मांडला मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर अनेक ठिकाणी शासनाकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज रामनाथ विद्यालयामध्ये अतिशय मौलिक विचार श्री भाऊसाहेब उमाटे यांनी विद्यार्थ्यांना सांगून प्रत्यक्षात मराठवाडा मुक्तीचा इतिहास मुलांच्या समोर उभा केला सर्व विद्यार्थ्यांना त्यातून मराठवाडा मुक्त होण्यासाठीची अनेकांनी केलेल्या कार्याची माहिती सविस्तरपणे समजून घेण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रभाकर कापसे यांनी केले कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी श्री डॉक्टर बी आर पाटील यांनीही विद्यार्थ्यांना या शौर्य गाथा मराठवाड्याची या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील सर यांनी केले तर आभार श्री भास्कर सूर्यवंशी यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील क्रीडाशिक्षक रंगनाथ अंबुलगे, प्रा. पी के मुळे चव्हाण बी डी हुरदळे प्रशांत ,नरसिंग पंडगे शरण धाराशिवे, इत्यादी शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

أحدث أقدم