अभाविप लातूर महानगर अध्यक्षपदी प्रा.डॉ. डोंगरे व महानगरमंत्री एकोर्गे यांची निवड

अभाविप लातूर महानगर अध्यक्षपदी प्रा.डॉ. डोंगरे व महानगरमंत्री एकोर्गे यांची निवड
लातूर / प्रतिनिधी-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही गेल्या ७५ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक अशा विविध  क्षेत्रात कार्यरत असणारी विद्यार्थी संघटना आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या सोडविण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दशकांपासून काम करत आहे.दरवर्षी विद्यार्थी परिषदेत नवीन कार्यकारिणी ची घोषणा ही होत असते.त्याचप्रमाणे यावर्षी  अभाविप लातूर महानगर आयोजित "संकल्प छात्र नेतृत्वाचा" महानगर विद्यार्थी संमेलन व महानगर कार्यकारिणी घोषणा केशवराज माध्यमिक विद्यामंदिर,लातूर येथे संपन्न झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ.संदीपान जगदाळे हे उपस्थित होते.तसेच निर्वाचन अधिकारी म्हणून प्रा.जितेंद्र जोशी सर हे उपस्थित होते.यावेळी पुनर्निर्वाचित महानगराध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.शिवप्रसाद डोंगरे व महानगरमंत्री म्हणून सुशांत एकोर्गे यांची घोषणा करण्यात आली.त्याचप्रमाणेपश्चिम नगर व पूर्व नगर कार्यकारिणी घोषणा करण्यात आली . यामध्ये पूर्व नगरराध्यक्ष म्हणून प्रा.डॉ मनोहर चपळे व नगरमंत्री म्हणून ओमकार पोतदार यांची घोषणा करण्यात आली. व पश्चिम नगरअध्यक्ष म्हणून प्रा.डॉ वीरेंद्र चौधरी व पश्चिम नगर मंत्री म्हणून सागर वाडीकर यांची घोषणा करण्यात आली.तसेच विविध आयाम व गतीविधी अंतर्गत कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी विविध हाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم