युनिसेफच्या वतीने श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेतकार्यशाळेचे आयोजन

युनिसेफच्या वतीने श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत
कार्यशाळेचे आयोजन 
  औसा (प्रतिनिधी )- भारत सरकार आणि युनायडेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन एजुकेशन फंड (UNICEF) यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवण्यात येणाऱ्या स्किल बेस्ट डिजिटल प्राडॉक्टीव्हिटी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. युनिसेफ यांनी जाहीर केलेल्या रिपोर्ट प्रमाणे भारतामधील २०३० पर्यन्त फक्त ४५. ९% पदवी धरांना रोजगार मिळेल असे जाहीर केले आहे. याच धर्तीवर UNICEF अंतर्गत पासपोर्ट टू अरनिंग (P2E) या कार्यशाळेचे आयोजन श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमधील पदविका व पदवी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले जेणे करून त्यांना येणाऱ्या भविष्यमध्ये रोजगाराची किंवा उद्योधंद्यांमध्ये संधी उपलबद्ध होईल. या कार्यशाळेसाठी भारतामधील UNICEF चे प्रशिक्षक श्री राजरतन दुपारे व सौ. अश्विनी दुपारे तसेच श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, संस्थेच्या, उपाध्यक्षा सौ. जयदेवी बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री. शिवलिंग जेवळे, संचालक सौ. माधुरी बावगे, प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे) संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य वीरेंद्र मेश्राम, डॉ लोणीकर नितीन इत्यादी मंचावर उपस्थित होते. या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोडक्टिव्हिटी या कोर्स चे मार्गदर्शन देण्यात आले, त्यांच्याकडून कोर्स पूर्ण करून घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेल्या प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण करताना लातूर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचर्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी येणाऱ्या काळामध्ये पदवीबरोबरच कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले तसेच संचालक नंदकिशोर बावगे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
या कार्यशाळेमध्ये ४७६ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदऊन हा UNICEF चा डिजिटल प्रोडकटीविटी P2E चा कोर्स पूर्ण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने आणि आभार प्रदार्शन प्रा. बालाजी खवले यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم