शासकीय कार्यालयांमध्ये दुर्मिळ वृक्ष बियाणे बँक तयार करणार - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 शासकीय कार्यालयांमध्ये दुर्मिळ वृक्ष बियाणे बँक तयार करणार -         जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर : जिल्ह्यात नैसर्गिक अधिवास असलेले दुर्मिळ वृक्ष वाढावेत, वृक्ष चळवळ लोकचळवळ व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागात दुर्मिळ वृक्षांच्या बियाणांची बॅंक सुरू करण्यात आली आहे. राज्यातील हा एक अनोखा उपक्रम असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशाप्रकारे दुर्मिळ वृक्षांच्या बियाणांची बँक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेने सुरु केलेल्या दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे याच्या दालनात सह्याद्री देवराईद संस्कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या बियाणे बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. या बियाणे बँकेत स्थानिक प्रजातीच्या 75 दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हा एक अनोखा उपक्रम आहे. या माध्यमातून दरवर्षी सहा लाख वृक्षांची निर्मिती करण्याचा मानस आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी रोप विकत घेण्याची गरज भासणार नाही. वृक्ष लागवडीसाठी हा दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे.

आपण प्रत्येकजण घरी सिझनेबल फळं खात असतो. प्रत्येकाने बियाणे बॅंक तयार करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. शाळामहाविद्यालयसामाजिक संस्था यांनी आपली स्वतःची बियाणे बॅंक तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होत बियाणे बँक उपक्रमास शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांनी बियाणे बॅंकेची माहिती दिली. तसेच हा एक छोटासा उपक्रम आहे, पण यातून मोठी चळवळ उभी राहणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

उदगीर नगरपरिषद मुख्याधिकारी शुभम क्यातमवारअहमदपूर नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडेनिलंगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदेचाकूर नगरपंचायत मुख्याधिकारी अजय नरळे, रेणापूर नगरपंचायत रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी मंगेश शिंदेजळकोट नगरपंचायतचे मुख्याधिकारी भुषण वर्मासह्याद्री देवराईचे सुपर्ण जगतापडॉ. बी.आर. पाटीलशिवशंकर चापोलेद संस्कृती फोऊंडेशनचे प्रा. डॉ. सितम सोनवणेदिपरत्न निलंगेकरअभय मिरजकरपुजा बोमणे,  अमोल इंगळेऋषी बोईनवाडअनिल कुरेनितीन ढोनेबालाजी कोळीतोसिक शेख, संग्राम सूर्यवंशीसुहास देशमुख, श्रध्दा चव्हाण आदी यावेळी उपस्थित होत. 

Post a Comment

أحدث أقدم