मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली..!

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली..!
बोरोळ येथे साखळी उपोषण सुरू

देवणी/प्रतिनिधी -तालुक्यातील बोरोळ येथे  मनोज जरांगे पाटील यांच्या गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढ्याला जाहीर पाठिंबा देत देवणी तालुक्यातील बोरोळ येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बोरोळ येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देऊन साखळी उपोषण सुरुवात करण्यात आले. 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचे अल्टिमेटम दिले होते, आज २४ ऑक्टोबरपर्यंत हे अल्टिमेटम होते.तो अल्टिमेटम संपला आहे. यामुळे आजपासून पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: आमरण उपोषणासाठी बसण्याची घोषणा केली असुन सरकारला दिलेला अल्टिमेटमचा २४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. अजुनही सरकारकडून कोणतीच घोषणा केलेली नाही. आता राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणालचा लढा सुरुच आहे. 
बुधवारी झालेल्या सकल मराठा समाज देवणीच्या बांधवांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचा आरक्षण मराठा अरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार देवणी तालुक्यातील बोरोळ येथे (दि.२५) बुधवार ते (दि. २८) शनिवार पर्यंत साखळी उपोषण. आंदोलनाची पुढील दिशा ठरल्याप्रमाणे (दि.२९) रविवार पासूनच आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी देवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बोरोळ व तसेच देवणी तालुक्यातील इंद्राळ, शिंदीकामठ, वागदरी , गुरनाळ , लासोना व देवणी येथील मराठा बांधव सहभागी होते.
दि.२५ बुधवार पासुन सकल मराठा समाज देवणीच्या वतीने तालुक्यातील गावोगावी मराठा आरक्षणाबाबत बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे. गावागावात जाऊन आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी गावभेटी घेऊन वेगवेगळ्या गावातील नागरिकांनी बोरोळ येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देत सहभागी होण्यासाठी देवणी तालुक्यातील सर्व समाज बांधवशी चर्चा व बैठका घेऊन गावागावात हे सर्व आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आव्हान करण्यात येणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم