औसा शहरात क्रीडा संकुल,जीम व क्रीडा विद्यापीठ मंजुर करण्याचे मंत्री बनसोडे यांचे आदेश

औसा शहरात क्रीडा संकुल,जीम व क्रीडा विद्यापीठ मंजुर करण्याचे मंत्री  बनसोडे यांचे आदेश
 जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांच्या निवेदनास यश

औसा:राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नूतन जिल्हाध्यक्ष श्री सुलोमान शेख यांच्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी, राज्याचे क्रीडा मंत्री  श्री संजय बनसोडे यांना दिलेल्या निवेदनावरून मंत्री महोदयांनी, औसा शहर येथे क्रीडा संकुल, जीम मंजुरीचे व तसेच औसा तालुक्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे आदेश प्रधान सचिव यांना दिलेली आहेत.
औसा शहरात क्रीडा संकुल,मोठे जीम व्हावे ही औसातील तरुणांची व युवक विद्यार्थ्यांची पूर्वीपासूनच मागणी राहिलेली आहे, याची दखल घेत राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री सुलेमान शेख यांनी राज्याचे क्रीडामंत्री यांना निवेदन देत असे म्हटंले आहे की युवक मित्रांना दररोजचे व्यायाम इत्यादीसाठी क्रीडा संकुल आवश्यक आहे व औसा नगरपालिकेने याआधी यासंबंधी ठराव पारीत केलेला आहे तसेच त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे व त्यासाठी आवश्यक असणारी जागाही औसा तालुक्यामध्ये उपलब्ध आहे, सुदैवाने राज्याची क्रीडामंत्री पद हे लातूर जिल्ह्याला असल्याने व आपण औसा तालुक्याचे भूमिपुत्र असल्याने, सदर विद्यापीठ हे औसा तालुक्यात झाल्यास खूप चांगलं होणार आहे, यासह अनेक मुद्दे उपस्थित केले होते त्यावर मंत्री महोदयांनी प्रधान सचिव, क्रीडा व युवक कल्याण यांना सदर विषय मंजूर करायचे आदेश पारित केले आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांच्या सह जिल्हा सरचिटणीस फरहान सिद्दिकी उपस्थित होते
*अजित दादामुळे औसा क्रीडा संकुलास 5 कोटीची निधी मंजुर व जागेसाठी प्रयत्न केले पण कोरोना मधे खरेदीची बंदी असल्याने ब्रेक लागला -अफसर शेख*
औसा शहरातील क्रीडा संकुलास तत्कालीन नगराध्यक्ष असताना मी पाच कोटीचा निधी मंजूर केलेला होता व यासाठी जागेचा प्रयत्नही  जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवला होता परंतु मध्यंतरी कोरोना परिस्थिती आल्यामुळे दोन वर्षाचा खंड पडला ज्यामुळे जागा हस्तांतरित करण्यास च्या कामास ब्रेक लागला. कोरोना काळात नगरपालिकेस कोणतेही खरेदी करण्यास व नवीन प्रकल्प उभारण्यास बंदी घालण्यात आलेली होती त्यामुळे सदर जागेची खरेदी होऊ शकली नाही याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निगराणीखाली अनेक वेळा बैठका घेण्यात आलेल्या होत्या.

Post a Comment

أحدث أقدم