भारतीय संस्कृती व आपण या विषयावर स्वामी यांनी व्याख्यानाचे ३ रे पुष्प गुंफले

भारतीय संस्कृती व आपण या विषयावर स्वामी यांनी व्याख्यानाचे ३ रे पुष्प गुंफले  
मुरुम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे दरवर्षीप्रमाणे शारदोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. यावेळी भारतीय संस्कृती व आपण या विषयावर ३ रे दिवसाचे पुष्प प्रविण स्वामी यांनी गुंफले. यावेळी बोलताना म्हणाले की, भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, मानवता, माणूसकी या गुणामुळे ही भारतीय संस्कृती जगात सक्षम ठरली असल्याचे मत प्रविण स्वामी यांनी मांडले. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संभाजी पाटील होते. प्रमुख पाहुणे पत्रकार योगेश पांचाळ, परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बी. ए. बिराजदार, मुख्याध्यापक  महेश हरके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अविनाश दुनगे तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख गोपाळ गेडाम यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे संचालक शंकर हुळमजगे, आनंदराज बिराजदार, शिक्षक महेश खंडाळकर, व्यंकट बिराजदार, सौरभ उटगे, प्रविण स्वामी, चंद्रकांत बिराजदार, प्रा. सुरेश जाधव, प्रा. महादेव बिराजदार, गणेश जोजन, आपु मुदकन्ना, कोमल किर्तन, पार्वती जगताप, कालिंदी भाले, सुप्रिया झिंगाडे, आम्रपाली गायकवाड, राजेंद्र जाधव, भरत हेडे सह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم