बसवराज पाटील यांच्या हस्ते टिळक चौकातील दुर्गा मातेची पुजा

बसवराज पाटील यांच्या हस्ते टिळक चौकातील दुर्गा मातेची पुजा
मुरूम (प्रतिनिधी) : येथील टिळक चौकातील टिळक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सन १९८० पासून दुर्गा मातेची स्थापना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते दुर्गा मातेची पूजा करण्यात आली. यावेळी शंकर पाताळे, पंडित चिलोबा, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, धनराज मंगरुळे, देवेंद्र कंटेकुरे, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, सुजित शेळके, गोविंद कौलकर, श्रीराम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बसवराज पाटील यांनी उपस्थित नागरिकांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध संस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकज पाताळे, उपाध्यक्ष निनाद ख्याडे, सचिव भूषण पाताळे, अभिजित कौलकर, बापूराव चिलोबा, सतीश पाताळे, उमाकांत जाधव, अभिजित किणगे, युवराज देसाटे, गणेश चिलोबा, रमेश चिलोबा, अमर गिरीबा, लक्ष्मण गिरीबा, गोविंद महामुनी, मनोज नागलगे, भिमाशंकर चिलोबा, अनिल मंटगे, प्रताप गिरीबा, निखिल वाले आदींसह मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव उत्साह व शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم