कर्ज व नापिकिला कंटाळून चाळीसीत कवटाळले मृत्युला

कर्ज व नापिकिला कंटाळून चाळीसीत कवटाळले मृत्युला
देवणी/प्रतिनिधी-तालुक्यातील अनंतवाडी येथील एका युवा शेतकऱ्याने गुरुवारी (ता. १२) रोजी कर्जबाजारीपणा व सततच्या नापीकिला कंटाळून मृत्यूला कवटाळला आहे.चालू वर्षातील दुष्काळी स्थिती, बँकेचे कर्ज, अन् सततची नापीकी यातुन जीवनाशी सुरू असलेला संघर्ष संपवत अंनतवाडी येथील संजीव तानाजी भोसले (वय ४०) या युवा शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीव भोसले यांना दहा एकर शेती आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीच्या उत्पन्नात सतत घट होत असल्याने व बँकेचे कर्ज थकल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. तलावातील पाण्यावर लावलेला ऊसही पाण्याअभावी वाळत होता. शिवाय सोयाबीनचे उत्पन्नही दुष्काळी स्थीतीमुळे घटल्याने अखेर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. व गुरुवारी सायंकाळी अनंतवाडी येथील शेतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم