उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये ३०००रु ची लाच घेतल्या प्रकरणी लाचलूचपत विभागाच्या जाळयात

उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये ३०००रु ची लाच घेतल्या प्रकरणी लाचलूचपत विभागाच्या जाळयात
लातूर -लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे आता या घटनेवरून पुन्हा एकदा सिध्द झाले असून ,या अधिकार्यांनी हप्तेवसुली मध्ये कहर केला असून'ना वापर' प्रकारात असलेली एक ट्रॅव्हल्स गाडी 'वापर' प्रकारात आणून त्यावरचा टॅक्स वाढविण्यासाठी १ विजय भोये यांनी सुरुवातीस ५००० /- रुपयेची व तडजोडी अंती ३००० /- रुपयेची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम आलोसे क २ प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, वर्ग ३. लातूर यांच्या कडुन स्विकारण्याचे कबुल केले. सदरची लाचेची रक्कम ३००० /- रुपये आलोसे क्र २ प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, लातूर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथे पंचासमक्ष स्वतः स्विकारली. लाच रक्कम रक्कम स्विकारण्यासाठी आलोसे क ३ जिलानी मेहबूब शेख, खाजगी इसम यांनी प्रोत्साहन दिले आहे. सर्व आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.या कार्यवाही मुळे आता सर्वसामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे
आरोपी लोकसेवक १. विजय चिंतामण भोये वय - ४६ वर्षे पद - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्ग-१, लातूर जिल्हा - लातूर २. प्रमोद उत्तम सोनसाळी वय ४४ वर्षे, धंदा नोकरी, पद कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन - विभाग, लातूर, ३. जिलानी मेहबूब शेख, वय ४९ वर्षे, पद खाजगी इसम (एजंट), रा. इंडिया नगर अमन कॉलनी, लातूर यांच्या विरुध्द कलम ७, ७ अ, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल.
वरील प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे घटक यांचे कडुन झालेल्या सापळा कारवाई वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर घटकाच्या दोन पथकांनी लागलीच वरील दोन आरोपी लोकसेवकांच्या घरी छापे टाकुन घरझडती केली असता घरझडती दरम्यान काही एक संशयीत रक्कम अथवा दस्ताऐवज आढळुन आलेली नाही. वरील प्रमाणे झालेल्या सापळा कारवाई वरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुरन 615/ २०२३ कलम ७, ७ अ, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये 04/ 55 वाजता गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि. लातूर हे करीत आहेत. यातील तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم