हासेगाव फार्मसीत जीपॅट आणि स्पर्धा परीक्षावरती विशेष व्याख्यान


हासेगाव फार्मसीत जीपॅट आणि स्पर्धा परीक्षावरती विशेष व्याख्यान 
                औसा (प्रतिनिधी ) हासेगाव येथे श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात " जी पॅट आणि स्पर्धा परीक्षावरती विशेष व्याख्यान "या विषयावर एक दिवशीय विशेष व्याख्यान आयोजन करण्यात आले .     
                        या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हुणुन शैक्षणिक ऑफ नायपर चे संचालक आणि संस्थापक सचिव डॉ महेश काळे , संस्थेचे कोशाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे), डॉ नितीन लोणीकर आदी. मान्यवर उपस्थित होते .  
             डॉ. महेश काळे यांनी जी पॅट आणि स्पर्धा परीक्षाची तयारी कशी करायची त्याचे महत्व काय आहेत आणि त्याचे उच्च शिक्षणासाठी काय फायदे हे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.

                          याप्रांसगी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.   
             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. पटेल आयेशा यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم