ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून ठाकरे शिवसेनेचे अनोखे आंदोलन

ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून ठाकरे शिवसेनेचे अनोखे आंदोलन
लातूर:  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊद्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑटो रिक्षा क्रेनला लटकवून रॅली काढून अनोखे अंदोलन करण्यात आले .
   महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक सेना जिल्हाध्यक्ष त्र्यंबक स्वामी व शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिक्षामध्ये पुढील सीटवर प्रतिकात्मक मुख्यमंत्री व मागील सेटवर दोन उपमुख्यमंत्री बसवून सरकारचे लक्ष वेधून रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाचे अंमलबजावणी करावी, ऑटो रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजे ,राज्यातील कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या तसेच रिक्षावर झाड कोसळून अपघातामुळे मयत झालेल्या रिक्षा चालकाच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.
 यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष त्र्यंबक स्वामी,महानगर प्रमुख विष्णूपंत साठे, तानाजी करपुरे, हनुमंत पडवळ, रिक्षात पाठीमागे बसलेले प्रतिकात्मक उपमुख्यमंत्री रिक्षा चालक कांबळे व रघुनाथ सपकाळ ,तसेच पुढील सिटवर प्रतिकात्मक मुख्यमंत्री तिन चाकाचे सरकार चालवणारे सिद्धनाथ लोमटे हे होते. या कार्यक्रमास रेणापूर येथील रिक्षा चालक गणेश नागमोडे, डिगांबर घोडके, संजय काळे ज्ञानेश्वर सिंपाळे, बाबा सिकलकर, नुरखाॅं पठाण, नयुम शेख लातूर येथील विनोद मोरे, बालाजी बारबोले, भोकरे, गंगणे, सह अनेक रिक्षा चालक सहभागी झाले होते, या तिन चाकी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

أحدث أقدم